30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeटॉप न्यूजकेजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिल्लीतील सरकारी कार्यालयांमध्ये यापुढे आंबेडकर, भगतसिंग यांचे फोटो...

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिल्लीतील सरकारी कार्यालयांमध्ये यापुढे आंबेडकर, भगतसिंग यांचे फोटो लागणार

टीम लय भारी

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी जाहीर केले की दिल्ली सरकारच्या प्रत्येक कार्यालयात राजकारण्यांऐवजी डॉ बीआर आंबेडकर आणि स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग यांचे फोटो असतील(Delhi Government offices will now have photos of Ambedkar and Bhagat Singh).

“आज, मी जाहीर करतो की दिल्ली सरकारच्या प्रत्येक कार्यालयात बीआर आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो असतील. आता आम्ही कोणत्याही मुख्यमंत्र्याचे किंवा राजकारण्याचे फोटो लावणार नाही,” असे केजरीवाल यांनी एका कार्यक्रमात सांगितले. या कार्यक्रमात बोलताना केजरीवाल म्हणाले की, ते खरोखरच डॉ. आंबेडकर आणि भगतसिंग यांच्यापासून प्रेरित आहेत. डॉ.आंबेडकरांच्या संघर्षाचे स्मरण करून ते म्हणाले की, ज्या काळात इंटरनेट नव्हते, त्या काळात डॉ. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले होते.

केजरीवाल म्हणाले की, देशातील प्रत्येक मुलाला, मग ते गरीब किंवा श्रीमंत कुटुंबातील असो, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हे डॉ. आंबेडकरांचे स्वप्न होते. आज आम्ही बी.आर. आंबेडकरांचे प्रत्येक मुलासाठी दर्जेदार शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याचे वचन देतो. गेल्या सात वर्षांत आम्ही ती क्रांती शिक्षण क्षेत्रात आणली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनीही दिल्लीच्या सरकारी शाळांना भेट दिली.

हे सुद्धा वाचा

हल्ला झाल्यास राज्यांनी स्वत: रणगाडे विकत घ्यायचे का, केजरीवालांचा थेट मोदींना सवाल

दिल्ली लॉकडाऊनकडे वाटचाल करत आहे

‘मी गांधींना का मारले’ या चित्रपटाचे प्रदर्शन राज्यात थांबवावे, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांना मागणी

Delhi govt offices will now have photos of Ambedkar, Bhagat Singh: Kejriwal

आम्ही ‘देशभक्ती’ वर्गही सुरू केले आहेत. दिल्लीत आम्ही एक शिक्षण मंडळ सुरू केले आहे ज्याचे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ ‘आयबी’शी टायअप आहे. आम्ही दिल्लीत एक शिक्षक विद्यापीठ बांधत आहोत. केजरीवाल यांनी सांगितले केले की, भगतसिंग आणि डॉ आंबेडकर यांचे मार्ग वेगळे होते पण त्यांची स्वप्ने एकच होती. “या दोघांनीही समता आणि भेदभाव नसलेल्या देशाचे स्वप्न पाहिले होते… त्यांनी क्रांतीचे स्वप्न पाहिले होते. आज तीच क्रांती आमचेही स्वप्न आहे,” असे देखील केजरीवाल म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी