29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रWorkFromHome : दिलीप वळसे - पाटलांचे मतदारसंघात लक्ष; रस्त्यांसाठी १० कोटी मंजूर...

WorkFromHome : दिलीप वळसे – पाटलांचे मतदारसंघात लक्ष; रस्त्यांसाठी १० कोटी मंजूर करून घेतले

टीम लय भारी

टाकळीहाजी : आंबेगाव शिरुर (Ambegaon Shirur) मतदारसंघातील जिल्हा परिषद अंतर्गत व ग्रामिण जिल्हा रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांच्या प्रयत्नातून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार पोपटराव गावडे (Popatrao Gawde) यांनी दिली आहे.

शिरुर आंबेगावमधील २१ रस्त्यांसाठी १० कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून शिरुरमध्ये पिंपरखेड ते पारगाव रस्ता १ कोटी १५ लाख रुपये,गणेगाव खालसा ते पद्मावती रस्ता ९०लाख रुपये, जातेगाव ते प्रजिमा ९० लक्ष रुपये, दुडेवाडी ते शिंदेवाडी ४० लक्ष, चांडोह ते जांबूत ४० लक्ष, म्हसे बु ते टाकळीहाजी ९० लक्ष, डोंगरगण ते टाकळीहाजी ५० लक्ष, पिंपरखेड ते आंबेवाडी ४० लक्ष, पाबळ येथिल नर्हेबंद ते थापेवाडी ५० लक्ष, पाबळ ते फुटाणेवाडी ५० लक्ष तर आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे खेड ते जरेवाडी ४० लक्ष, चांडोली बु ते बेल्हा रस्ता ३० लक्ष, कळंब ते लौकी ३५ लक्ष, कानसे पाचकेवाडी ते माळवाडी ४० लक्ष, अवसरी बु प्रजिमा १८ ते प्रजिमा १३ खालचा थर, लाखणगाव ते कवठे रस्ता ३० लक्ष, भागडी ते शिंगवे हद्द २५ लक्ष, प्रजिमा १३ ते जाधववस्ती प्रजिमा ६ ला मिळणारा रस्ता ३० लक्ष, प्रजिमा ३९ वळती शिंगवे रस्ता ३० लक्ष पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे ते गावडेवाडी ४० लक्ष, जवळे येथिल गावठाण ते थापलिंग रस्ता ३० लक्ष रुपये मंजूर झाला आहे.

रोहित पवारांची बॅटींग भक्तांना लागली जिव्हारी

 

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, हे रस्ते जिल्हा परिषद अंतर्गत व जिल्हा ग्रामिण रस्ते असल्यामुळे हे रस्ते चांगले होण्याकरीता अनेक दिवसांपासून जनतेची मागणी होती. त्यामुळे या निधीमुळे आंबेगाव शिरुर तालूक्यातील रस्ते मजबूत होणार असून जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी व कामगार व उत्पादनशुल्कमंञी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे या रस्त्यांचा प्रश्न मांडला होता.त्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून शिरुर तालूक्यातील या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला असल्याचे गावडे यांनी सांगितले.

अरेरे : गुजरातवरून आलेला मृतदेह कर्नाटकने नाकारला, महाराष्ट्राने अंत्यसंस्कार केले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी