33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजखाद्यतेल वर्षाअखेरीस महागणार, खवय्यांच्या खिशाला लागणार कात्री

खाद्यतेल वर्षाअखेरीस महागणार, खवय्यांच्या खिशाला लागणार कात्री

टीम लय भारी

मुंबईः व्यावसायिक गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असून, उपाहारगृहातील खाद्यपदार्थही महागणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच व्यावसायिक गॅस महागलाय(Edible oil will become more expensive by the end of the year)

त्यात 266 रुपयांची वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा गॅस जवळपास 100 रुपयांनी महागलाय. एका वर्षात 866 रुपयांची वाढ झाल्यानं खाद्यपदार्थांचेही दर वाढवण्याची तयारी व्यावसायिक करत आहेत.

काँग्रेसला दूर ठेवून कोणती आघाडी होत असेल तर, हे योग्य नाही : संजय राऊत

मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…

पेट्रोल आणि डिझेलच्या दराप्रमाणेच स्वयंपाकघरातील गॅसही महाग

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दराप्रमाणेच स्वयंपाकघरातील गॅसही महागत आहे. त्यामुळे उपाहारगृह चालवणारे व्यावसायिकही हे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत.

डिसेंबरमध्ये बरेच लोकांचे पाय हे आपसूकच उपाहारगृहांकडे वळतात. ख्रिसमसच्या काळात उपाहारगृहांना चांगली मागणी असते. परंतु दिवसागणिक गॅसचे दर वाढत असल्यानं आता नफ्या आणि तोट्याचं गणित कसं जुळवायचं याचीच चिंता त्यांना सतावतेय.

दिलासादायक: औरंगाबादेत दक्षिण अफ्रिकेतून आलेला विद्यार्थी निगेटिव्ह, आज 18 जणांचे अहवाल येणार!

This Edible Oil Penny Stock Turned Rs. 1 Lakh Into Rs. 35.5 Lakh In Just 6-Months

गॅसचे दर दिवसेंदिवस वाढतच चाललेत

गेल्या वर्षी 1189 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 2051 रुपयांना मिळतोय. तसेच त्यात विविध करही समाविष्ट असतात. केंद्राकडे विनंती करूनही गॅसचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे आता पदार्थांच्या किमती वाढवणे हा मार्ग आता उपाहारगृह चालकांकडे उरलाय. मध्यमवर्गीयांनी उपाहारगृहाकडे पाठ फिरवल्यास व्यवसायाचे दिवाळे लागेल, अशीही भीती व्यावसायिकांना आहे.

सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ

विशेष म्हणजे सध्या घरगुती सिलिंडरचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र व्यावसायिक सिलिंडर 100 रुपयांनी वाढवण्यात आलाय. दरम्यान सिलिंडरचे दर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिलिंडरच्या नव्या दरानुसार आता दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलिंडर 2100 रुपयांच्या पुढे गेला आहे.

दिलासा नाहीच

दरम्यान पुढील काळात पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर कमी होतील असा अंदाज वर्तवला जात होता. ज्याप्रमाणे केंद्राने पेट्रोल, आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून, सर्वसामान्यांना दिलासा दिला.

तसाच काहीसा निर्णय गॅस सिलिंडरबाबत देखील होऊ शकतो, अशी अपेक्षा होती. मात्र याउलट गॅस सिलिंडरचे दर आज पुन्हा एकदा शंभर रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याचा मोठा आर्थिक फटका हा व्यवसायिकांना बसणार असून, यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी