34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयमुस्लीम बांधव 'मोहरम' का साजरा करतात ? जाणून घ्या कारण

मुस्लीम बांधव ‘मोहरम’ का साजरा करतात ? जाणून घ्या कारण

प्राची ओले : टीम लय भारी

इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. मोहरम हा एक अरेबिक शब्द आहे. याचा अर्थ निषिद्ध, धिक्कार करणे असा आहे (Moharram is the beginning of the year).

इस्लाम धर्मगुरू महम्मद पैगंबर यांनी हा धर्म निर्माण केला. त्यांना ह्या धर्माचा दृष्टांत झाला. यालाच ते ‘इलहाम’ असे म्हणतात. पैगंबर म्हणजे इस्लाम धर्माचा ‘पैगाम’ (संदेश) लोकांपर्यंत पोहचवणारे प्रेषित. यामुळेच लोक त्यांना ‘सल्लील्लाहू अलेह वासल्लम हजरत पैगंबर नबी’ असे ओळखतात.

MARKAJ : मुस्लिमांचं काय करायचं ? ( संजय आवटे )

Covid19 : मुस्लिम बांधवांचे कौतुकास्पद पाऊल, ‘कोरोना’साठी देऊ केली इमारत

 Moharram is the beginning of the year
हजरत इमाम हुसैन

मोहरमचा हा महिना आधी पवित्र मानला जायचा. या महिन्यात युद्ध व रक्तपात करण्यास मनाई आहे. परंतु पैगंबर हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू, हजरत इमाम हुसैन हे त्यांच्या 72 सैनिकांसोबत करबलाच्या लढाईत हुतात्मा झाले. करबला लढाई सम्राट यजीद आणि हजरत इमाम यांच्यात झाली होती. दरवर्षी त्या शहिदांच्या स्मरणार्थ ताजिया मिरवणूक काढली जाते. या दिवशी रोजा पाळला जातो (During mohrram, Hazrat Imam Husain along with 72 of his soldiers were martyred in the battle of Karbal).

मोहरमच्या महिन्यात जागोजागी पाण्याची सोय केलेली का केलेली असते?

‘‘अली अली हाय अली रोके ये जनब ने कहा भाई मेरा कत्ल हुआ हाय अली हाय अली’’,
‘‘पानी पियो तो याद करो प्यास इमामकी
प्यासो ये है सबील शहिदो के नाम की’’,
‘‘रो रो कहती थी बाली सकिना
जालिमो मेरे गौहर न छिनो
मै हूं बिन्ते इमामे मदिना
जालिमो मेरे गौहर न छिनो’’

हुसैन यांचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेन यांच्या नातेवाईकांना पाणी देखील मिळून दिले नाही. म्हणून या दिवशी ठिक ठिकाणी थंड पाण्याची सोय केली जाते. हुसैनचे ७२ अनुयायी या लढाईत मारले गेले. या युद्धभूमीत केवळ हुसैन आणि त्यांचा ६ महिन्यांचा पुत्र अली असगर उरले होते. तहानेने व्याकूळ झालेल्या आपल्या पुत्रासाठी हुसैनने सैन्याकडे पाण्याची मागणी केली परंतु, पाणी देण्याऐवजी या चिमुकल्याचा बाण मारून जीव घेण्यात आला. या युद्धात हुसैन यांनाही मारण्यात आले. या नरसंहारानंतर मुस्लिम बांधव या महिन्याकडे ‘मातम का महिना’ म्हणून पाहतात (On the day of Hussein assassination, the enemy did not even provide water to Hussein relatives).

Moharram is the beginning of the year
मोहरमच्या च्या दिवसात जागो जागी पाण्याची सोय केलेली असते

PoliceAction : सोशल मीडियात मुस्लिमांबद्दल विद्वेष पसरविणाऱ्या अंध भक्ताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Muharram holiday: These are the dates announced by state governments

मोहरम हा आनंदाचा सण नसून दु:खाचा दिवस आहे. या दिवशी हसेन आणि हुसैन यांचे बलिदान उजागर केले जाते. शिया समुदायातील लोक १० दिवस काळे कपडे घालतात. या बलिदानासाठी जुलूस काढला जातो. इमाम हुसेन व त्यांच्या अनुनायांच्या हौतात्म्याच्या स्मृतींसाठी मोहरम साजरा केला जातो.

भारतीय उपखंडात शिया आणि सुन्नी असे दोन्ही मुसलमान उपपंथ आढळतात. यामध्ये शिया मुसलमान हे कमी कट्टर असतात आणि सुन्नी मुसलमान हे जास्त कट्टर असतात असा नुसताच समज नाही तर वास्तवातही तसेच आढळते.

या महिन्यातला १० वा दिवस आशुरा म्हणून सर्वत्र साजरा होतो. या दिवशी ताजिया मिरवणूक काढली जाते. त्यालाच ताबूत असे म्हणतात. ताबूत हा मिरवणुकीचा प्रकार फक्त भारत, इराण (पर्शिया) आणि इजिप्तमध्ये पाळतात. हा प्रकार अरबस्तानात पाळत नाहीत. कट्टर मुसलमान लोक ताबूत हा मूर्तिपूजेचा प्रकार अधार्मिक मानतात. ताजिया मिरवणूक ही त्या शाहीदांचे प्रतिक आहे. शिया समुदायाचे लोक ‘या हुसेन, हम न हुए!’ असे म्हणतात. याचा अर्थ ‘हजरत इमाम हुसेन, आम्ही खूप दु:खी आहोत. आम्ही करबलाच्या युद्धात तुमच्या सोबत नव्हतो’, असा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी