31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeसंपादकीयराजगड 'रोप वे' : सुविधा की विद्रुपीकरण

राजगड ‘रोप वे’ : सुविधा की विद्रुपीकरण

मृगा वर्तक : टीम लय भारी

पुणे : राजगडावर, तसेच बुद्धलेणी आणि एकविरा मातेचे मंदिर असलेल्या कार्ला डोंगरावर रोप वे ची सुविधा उपलब्ध करण्याबाबत निर्णय झाला आहे ( Ropeway will be available at Rajgad fort). पण त्यावर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

सोशल मीडियातील चर्चा बरीचशी नकारात्मक, तर काही स्वागतार्ह सुद्धा होती ( Discussion on Rajgad started in social media ). बऱ्याच दुर्गप्रेमींनी निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी केली आहे. ‘रोप वे’ झाल्यानंतर गडावर दुकाने स्टॉल्स यांच्यासोबत प्लास्टिक, थर्माकोलसारख्या अविघटनशील कचऱ्याचा सुकाळ होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Ropeway will be available at Rajgad fort
राजगड चढण्यासाठी अवघड किल्ला आहे ( छायाचित्र : मृगा वर्तक )

राजगडावर तशीही सपाट जागांची कमतरता आहे ( Rajgad is tricky fort ). ‘रोप वे’साठी गडावर मोठ्या प्रमाणात खोदकाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुरातन व ऐतिहासिक वास्तुंना धक्का लागू शकतो अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

वनाधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटली गोळी, त्यात वाघाचा नाहक गेला बळी

छत्रपती शिवाजी महाराजांना आक्रमणकर्ते म्हणणं गोवा पर्यटन खात्याला भोवलं

माहीम बीच लवकरच नवीन स्वरुपात पहायला मिळणार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली माहीम बीचची पाहणी

Aaditya Thackeray : पर्यावरण जपत पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न: आदित्य ठाकरे

राजगडाविषयी आणखी जाणून घ्या

निर्णय स्वीकारार्ह पण…!

‘रोप वे’ निर्णयाचे स्वागत करणाऱ्या मंडळींनी सुद्धा काही बाबींची दखल प्रशासनाने घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

तरुण वयात आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे  गडकिल्ले पाहता आले नाहीत किंवा लहान मुलांना न कळत्या वयापासूनच गड किल्ल्यांची, महाराष्ट्राच्या संस्कृतीची गोडी लागावी यासाठी पर्यटनाची आवड असण्याचा किंवा इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार सर्वानाच आहे. रायगड रोपवे काही प्रमाणात यशस्वी झाला. किल्ल्यावर काही रक्षक पाहऱ्यास असतात.

Ropeway will be available at Rajgad fort
प्रत्येकाने राजगड एकदा तरी पाहायलाच हवा ( छायाचित्र : मृगा वर्तक )

प्रसाधनगृहे बांधली गेली पण पुढे काय? अपुऱ्या निधी अभावी राखणदार कमी, तसेच बांधलेल्या प्रसाधनगृहांची दुरावस्था अशी स्थिती दिसते. राखणदारांना रात्रीची गस्त घालता येत नसल्यामुळे गैरव्यवहार होऊ नयेत म्हणून रायगडावर हवं तेव्हा हवं तिथे रात्रीचा मुक्काम करण्याची बंदी. आपला इतिहास सांगणाऱ्या या वास्तूंचे संवर्धन करणे गरजेचेच आहे. परंतु सौंदर्यसृष्टीचे भान राखणे महत्वाचे आहे. राहण्याचे ठिकाण, प्रसाधनगृहे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे ( Pathatic situation at Rajgad ).

‘रोप वे’ पूर्वनियोजित, पुढे काय?

राजगडावर रोप वे होणारच. 1994 मध्ये रायगडाच्या रोपवेसाठीसुद्धा असाच विरोध झाला होता. रायगड, सिंहगड, राजगड यानंतर पुढे असेच सर्व किल्ल्यांवर रोपवे होऊ घालतील.

शिवनेरी, हरिश्चंद्रगडावर कोकणकडा, तोरणा. परंतु गर्दी नियंत्रणात न आणता आल्यामुळे गडांची दुरावस्था होऊ नये. किल्ल्यांचे विद्रुपीकरण होऊ नये याची काळजी घ्यायला हवी.

Ropeway will be available at Rajgad fort
पावसाळ्यात राजगडावर विलोभणीय दृश्य पाहायला मिळते

राजगडाबद्दल हे माहिती आहे का?

या डोंगराचे पूर्वीचे नाव मुरूमदेव होते. अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक पहिला अहमद याने हा डोंगर ताब्यात घेतला. त्यानंतर डोंगराला गडपण येऊ लागले ( Rajgad fort built by Nijam ). त्यावेळच्यापासून गडाच्या रक्षणाची जबाबदारी गुंजण मावळातील शिलिमकर देशमुख यांच्याकडे होती. पुढे शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यात घेतला आणि स्वराज्याची राजधानी केली ( Rajgad was capital of Shivaji Maharaj ). गडाचे नामकरण केले राजगड. सईबाई आणि आऊसाहेबांसमवेत शिवाजी महाराजांनी तब्बल 26 वर्षे राजगडावरून राज्य कारभार केला.

राजगड हा मुख्य तीन माच्या, संजीवनी सुवेळा आणि पद्मावती तसेच बालेकिल्ला मिळून झालेला आहे. गडावर गणेश, मारुती, ब्रह्मर्षी, काळेश्वरी, भागीरथी, पद्मावती अशी दैवते काही चांगल्या, काही मोडक्या अवस्थेत असल्याचे अवशेष सापडतात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. परंतु पाणी पिण्यायोग्य नाही.

Ropeway will be available at Rajgad fort
राजगडावर पर्यटकांसाठी सोईसुविधा वाढवायला हव्यात

राजगडाला 4 मुख्य दरवाजे आहेत, गुंजवणे, पाली, अळू, काळेश्वरी ( There are 4 entry points to Rajgad ). यापैकी पाली दरवाजातून पर्यटकांची व दुर्गप्रेमींची ये – जा चालू असते. पाली दरवाजासोबतच गुंजवणे गावातून चोर दिंडीतून गडावर यायला मार्ग आहे. तो सुद्धा वापरात आहे. गुंजवणे दरवाज्याच्या मार्गावर काही ठिकाणी रेलिंगचे अवशेष दिसून येतात. परंतु सवय नसलेल्या दुर्गप्रेमींनी शक्यतो हा मार्ग टाळावा. ठिकठिकाणी खचलेल्या मातीमुळे चढणे उतरणे शक्य होत नाही.

काळेश्वरी बुरुजावरील मढे दरवाजा तर दुर्लक्षितच आहे. अळू दरवाजातून मात्र तोरणा किल्ल्याकडे जाण्यासाठी वाट आहे. साधारण 4 तासांच्या अंतरावर अळू दरवाजातून तोरणावर पोहोचता येतं. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजगड – तोरणा रिज वरून जे ढग वर येतात तेव्हाचं सौंदर्य विलोभनीय असतं. राजगडाची सध्याची रचना सुंदर आहे, प्रत्येकाने एकदातरी पहावा ( Rajgad is a beautiful fort ). या गडाची दुरावस्था होऊ नये

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी