35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयभाजप आमदार नितेश राणे यांचे खळबळ उडवून देणारं ट्विट

भाजप आमदार नितेश राणे यांचे खळबळ उडवून देणारं ट्विट

टीम लय भारी

मुंबई : राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडी सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून देणारे सुचक ट्विट केले आहे ( Nitesh Rane tweeted about saffron government ).

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली दिल्लीवारी ( Uddhav Thackeray meets Narendra Modi ), त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून झालेले संभाषण यांमुळे राज्यात बदलाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना व भाजप पुन्हा एकत्र येतील असे कयास बांधले जात आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये तणाव वाढत चालला आहे. आगामी येणाऱ्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणूका स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे ( Clashes between Congress and Shivsena ).

हे सुद्धा वाचा

सदाभाऊ खोत यांनी ‘महाविकास आघाडी’ला दिली भन्नाट उपमा, तुम्हालाही हसू येईल !

काँग्रेसला धनगरांबद्दल आसूया; कार्यकर्त्याला पद दिले, अन् एकाच दिवसांत काढून घेतले

उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंना ठणकावले

प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र समोर आले आहे ( Pratap Sarnaik’s letterbomb ). नरेंद्र मोदी आणि भाजपाशी जुळवून घेण्याची विनंती सरनाईक यांनी केली आहे.

या पत्रानंतर आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून देणारं ट्विट केले आहे ( Nitesh Rane made big statement ). या  ट्विटमध्ये भाजपा आमदार नितेश राणे ( Nitesh rane ) यांनी ‘महाराष्ट्रात भगव्याचं राज्य येते आहे. हीच ती वेळ’ असे म्हणत एकप्रकारे राज्यात आगामी काळात राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत.

आमचा ‘यू ट्यूब’ चॅनेलही सबस्क्राईब करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी