27 C
Mumbai
Friday, June 28, 2024
Homeसंपादकीयपोलिसांचा निजामी कारभार, शिवसेनेच्या २० जणांना तडीपारीच्या नोटीसा, आता 'हल्ला'' करण्याचा डाव...

पोलिसांचा निजामी कारभार, शिवसेनेच्या २० जणांना तडीपारीच्या नोटीसा, आता ‘हल्ला” करण्याचा डाव !

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता झालेला असुन शेवटच्या टप्पा आता लवकरच होऊ घातलेला आहे. येत्या २० मे ला नाशिकमध्ये ही शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. आणि अगदी निवडणूकीच्या या रणधुमाळीत नाशिकचे ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांना तडीपारची नोटीस देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता झालेला असुन शेवटच्या टप्पा आता लवकरच होऊ घातलेला आहे. येत्या २० मे ला नाशिकमध्ये ही शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. आणि अगदी निवडणूकीच्या या रणधुमाळीत नाशिकचे ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांना तडीपारची नोटीस देण्यात आली आहे(The final phase of voting will be held in Nashik on May 20). याच मुद्दयावर लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी सुधाकर बडगुजर यांच्याशी चर्चा केलेली आहे. तडीपारीच्या नोटीसीविषयी बोलताना बडगुजर यांनी राजकीय व्देषापोटी ही नोटीस त्यांना देण्यात आलेली असून सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे असे सांगितले . ही नोटीस म्हणजे सत्ताधा-यांचं षड्यंत्र आहे. इतकंच नव्हे बडगुजरांवर आता निवडणुकीचा चौथा टप्पा होण्याआधीच आत्मघातकी हल्ल्याचा कट ही काही जणांकडून केला जात असल्याचं बडगुजर यांनी सांगितलं.

पक्षफुटीनंतर ब-यांच जणांना पुन्हा मागे फिरावसं वाटलं, आपण चुकीचा निर्णय घेतल्याचंही अनेक शिंदे गटातील शिवसैनिकांनी खासगीत कबूल केल्यांचं ही बडगुजर यांनी सांगितलं. पण असे असले तरी गद्दार तो गद्दारच, त्यामुळे जोपर्यंत उध्दव ठाकरे सांगत नाहीत तो पर्यंत कुठल्याच शिंदे गटातील व्यक्तीला आम्ही ठाकरे गटात घेणार नाही. ‘पहले मंदिर, फिर सरकार’, असा नारा २०१८ साली उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी दिला होता पण कोर्टातून त्याला परवानगी मिळाल्यानंतर मोदी सरकार जागे झाले. नाशिकच्या अंतर्गत राजकारणासोबतच तेथील कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतक-यांविषयी आपले मत सुधाकर बडगुजर यांनी लय भारीशी बोलताना सांगितले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी