29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयतो निरोप अखेरचा ठरला!

तो निरोप अखेरचा ठरला!

ठाण्यात एक दोन वैचारिक वाद घालण्याच्या योग्यतेचे मित्र आहेत, त्यात कलेश निमकर शीर्षस्थ होता. तो खरा मार्क्सवादी, पण त्याने पेशा स्वीकारला ज्योतिषाचा. आयुष्यभर लोकांच्या कुंडल्या काढून दे, ज्योतिष ही विद्याशाखा आहे, ग्रहानुसार भविष्य बघता येते, माणसांचा स्वभाव, प्रगती होईल की नाही हे सांगता येते असे तो पुटपुट असे संथ लयीत. त्यात कुठेही बडेजाव नाही. ज्योतिष ही विद्याशाखा शिका असा आग्रह त्याचा नसायचा. त्याचा कामशास्त्र विषयाचा अभ्यास दांडगा होता. एका स्थानिक दैनिकाच्या दिवाळी अंकात तो या विषयावर खोलात जाऊन लिहायचा. पण आता या विषयावरचे लेख वाचता येणार नाही, ही रुखरुख आहेच.

जनमुद्रा या जिल्हा दैनिकात तो उपसंपादक होता बहुदा. संजय भालेराव, सुहास कुचेकर आदी आम्ही जांभळी नाका येथे भेटू तेव्हा चांगली चर्चा व्हायची. तीन चार महिन्यांपूर्वी असाच कार्यालयात आला होता. तेव्हाही सध्याचे केंद्रातले राजकारण कसे भरकटत चालले आहे. सामान्य माणूस काही मंडळींच्या राक्षसी महत्वाकांक्षामुळे कसा पिचला गेला. धर्म ही अफूची गोळी आहे, हे मार्क्सचे जगप्रसिद्ध वाक्य त्याने पुन्हा उद्गघृत केले होते. कधीही भेटल्यावर त्याच्या खास शैलीत हसायचा, मनसोक्त भीडभाड न ठेवता बोलायचा.

‘कोणत्याही चिकित्सेची सुरुवात धर्म चिकित्सेने होते ‘ असे मार्क्स म्हणायचा. धर्माची चिकित्सा त्याने हिंदू असूनही नाकारली नाही. ( पण समाजवादी मंडळीत राहून रेशीम बागेची फिलॉसॉफी पुढे रेटणारेही मी पाहिले, अनुभवले आहे.) धर्म हा चिकित्सेच्या पलीकडे गेल्यावर त्यात कर्मकांड माजते, असे तो नेहमी म्हणायचा. रसेल, सार्त्र हे पाश्चिमात्य विचारवंत ख्रिस्ती धर्माच्या चर्च व्यवस्थेविरोधात होते. सार्त्र तर ख्रिस्तीविरोधी असे सही करताना लिहायचा. रसेलने ख्रिस्ती धर्म व्यवस्थेच्या माध्यमातून वाढत चाललेल्या अनाचाराविरोधात भरपूर लिखाण केले आहे.

त्याला मृत्युदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. पण त्यातून तो सहिसलामत सुटला ही बाब अलहिदा. माणूस हा हजारो लाखों वर्षीपूर्वी शिकार करून जगायचा. तोच त्याच्या जगण्याचा आधार होता. त्यात तो सुखीही होता. आता जग अधिक जवळ आलेले असताना माणसा-माणसात जाती- धर्माच्या दऱ्या उभ्या राहत असताना कलेश सारखे मित्र जग सोडून जातात ही बाब मनाला क्लेश देणारी आहे. मार्क्स, रसेल, सार्त्र यांची विचार परंपरा अविरतपणे पुढे नेणाऱ्या या माझ्या मित्राला विनम्र अभिवादन!

हे सुद्धा वाचा
निधी वाटपवरून काँग्रेस भडकली; नाना पटोले यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
अजित पवारांना बहिणीचा सवाल, पंधरा दिवसांतच सावत्र भावासारखे का वागू लागलात?
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी विजय दर्डा व देवेंद्र दर्डा यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा  

ता.क….. तीन – चार महिन्यापूर्वी भेटलेल्या कलेशने लवकरच भेटू, बसू, बोलू असा जाताना निरोप दिला. पण तो निरोप अखेरचा असेल असे वाटलेच नाही. खुज्या माणसाच्या सावल्या लांबल्या तर विनाशकाळ अटळ असतो, असे कार्लाईलने लिहून ठेवले आहे. सध्याच्या काळात त्याचा प्रत्यय हरघडी येतच आहे. पण या विनाशकाळावर सूर्यासारखे प्रखर उत्तर देणारा कलेश नाही याची रुखरुख आहेच की! राजदरबारी हजारो हत्ती पोसले जातात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी