26 C
Mumbai
Thursday, June 27, 2024
Homeसंपादकीयतरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे. वेगवेगळया भागातील शेतकरी, कामगार तसेच काही राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांशी संवाद साधल्या नंतर लय भारी पोहचली नाशिक मधील तरूण पिढी, देशाचं भविष्य असणा-या युपीएससी-एमपीएससी च्या विद्यार्थांकडे.

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in the mind of the youth? Narendra Modi or the opposition?). वेगवेगळया भागातील शेतकरी, कामगार तसेच काही राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांशी संवाद साधल्या नंतर लय भारी पोहचली नाशिक मधील तरूण पिढी, देशाचं भविष्य असणा-या युपीएससी-एमपीएससी च्या विद्यार्थांकडे(Privatization of government work done by Narendra Modi in many places). नाशिक महापालिकेच्या अभ्यासिकेत स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या तरूणांशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांची महायुती आणि महाविकास आघाडीविषयी मिश्र मते आढळून आली. काही जणांना मोदींनी घोषित केलेल्या योजनांची माहिती होती खरी पण त्याच्या अमंलबजावणी विषयी बोलताना मात्र त्यांनाही मोदी कार्याविषयी शंका वाटली. विद्यार्थ्यांनी बोलताना विविध विषयांवर त्यांचं मत मांडलं असून संविधान दुरूस्तीसारखा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या राज्यात कायद्याला आणि न्यायव्यवस्थेला धाब्यावर बसवण्याचं काम हे सरकार करत आहे. पक्षफुटीसारख्या गोष्टी या लोकशाहीला पोषक नसून त्याविषयीचा कायदा करणं आता गरजेचं झालेलं आहे. नाशिकच्या कांदा प्रश्नाविषयीही विद्यार्थी बोलयाला विसरले नाहीत. कांदा निर्यात बंदीविषयी खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्या भारतात बेरोजगारीचा मोठ्ठा विषय देशासमोर असताना मोदींनी ब-याच ठिकाणी सरकारी कामाचं करण्यात आलेलं खाजगीकरण, अग्निवीर सारख्या योजना बंद करून तरुणांना कायमस्वरूपी कामाची हमी देण्याची मागणी लय भारीचे संपादक तुषार खरात यांच्याशी बोलताना समोर मांडली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी