29 C
Mumbai
Friday, June 28, 2024
Homeएज्युकेशनचंद्रकांतदादा, सीईटी सेलचे कान पिळा, चांगला आयुक्त नेमा !

चंद्रकांतदादा, सीईटी सेलचे कान पिळा, चांगला आयुक्त नेमा !

दादा, बारावीचा निकाल लागून दोन दिवस उलटले. तरीही विद्यार्थी व पालकांसाठी सीईटी सेलने कसलेही प्रसिद्धीपत्रक काढलेलं नाही. अशातच ७ लाख विद्यार्थी व पालकांचं दुर्दैव म्हणजे, तुमच्या सीईटी सेलचे आयुक्त महाराजे वारभुवन हे बिनडोक, अत्यंत उर्मठ, कमालीचे माजुरडे असे आहेत.

दादा, बारावीचा निकाल लागून दोन दिवस उलटले. तरीही विद्यार्थी व पालकांसाठी सीईटी सेलने कसलेही प्रसिद्धीपत्रक काढलेलं नाही(Chandrakantada, CET Cell’s ears, appoint a good commissioner). अशातच ७ लाख विद्यार्थी व पालकांचं दुर्दैव म्हणजे, तुमच्या सीईटी सेलचे आयुक्त महाराजे वारभुवन हे बिनडोक, अत्यंत उर्मठ, कमालीचे माजुरडे असे आहेत. २५ वर्षांच्या पत्रकारितेत आतापर्यंत माझा किमान २०० आयएएस अधिकाऱ्यांशी संपर्क आला असेल. त्यापैकी सर्वात घमंडी व जनहिताची जराही पर्वा न करणारा मी पहिलाच आयएएस अधिकारी पाहिला आहे.

उच्च शिक्षण खात्यात संजयकुमार(Sanjaykumar) व जे. एस. सहारिया(sahariya) हे दोन चांगले अधिकारी होते. पुढे हे दोघेही राज्याचे मुख्य सचिव झाले. या दोघांनीही शालेय शिक्षण व उच्च – तंत्र शिक्षण खात्याचे सचिव म्हणून काम केलं होतं. शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करणारे अधिकारी आम्ही एका बाजूला पाहीले आहेत. पण दुसऱ्या बाजूला वारभुवनसारखा घमंडी अधिकारी सुद्धा अनुभवायला मिळाला. वारभुवन यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा(Ajit Pawar) पवार बहुतेक चावलेले दिसतात. त्यामुळं आपल्या खुर्चीचा माज दुसऱ्या लोकांवर दाखविण्याची हौस अजितदादा यांच्या प्रमाणे वारभुवन यांनाही आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी