34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशननीट परीक्षेचे पेपर लीक करण्यासाठी तब्बल ३० लाखांची झाली होती डील

नीट परीक्षेचे पेपर लीक करण्यासाठी तब्बल ३० लाखांची झाली होती डील

टीम लय भारी

जयपूर : नीट परीक्षेची उत्तर तालिका मिळवण्यासाठी तब्बल ३० लाखांची डील ठरवण्यात आली होती. या प्रकरणात जयपूर पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. परीक्षा विद्यार्थिनींसोबत तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे (NEET exam paper are leaked at Jaipur).

जयपूरमधील विद्यार्थिनी दिनेश्वरी कुमारी, तिचे काका, पर्यवेक्षक राम सिंग, परीक्षा केंद्राचे प्रमुख मुकेश आणि इतर चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. आरोपी राम सिंग तोमर आणि मुकेश या दोघांनी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये प्रशपत्रिकेचे फोटो काढले होते. त्यांनतर हे फोटो त्यांनी जयपूरमधील चित्रकूट भागातील एका अपार्टमेंटमधील दोन व्यक्तींना व्हॉट्सअँप द्वारे पाठवण्यात आले होते. नंतर ते पेपर सिकरमध्ये पाठवण्यात आले होते.

पहा कसे साजरे झाले होळकर राजघराण्यांच्या जेष्टा गौरीचे पुजन

किरीट सोमैयांवर लावलेले आरोप फेटाळत चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा

त्यांनतर सिकरमधील व्यक्तीने याची उत्तरतालिका चित्रकूटमधील दोघांकडे पाठवली होती. चित्रकूटमधील दोघांनी ती मुकेश आणि रामसिंगला पाठवली होती. रामसिंगने ही उत्तरतालिका विद्यार्थिनी दिनेश्वरीला पेपर सोडवण्यासाठी दिली होती. अशी माहिती डीसीपी रिचा तोमर यांनी दिली आहे.

जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र

NEET 2021: Phase 2 Registration Before Results, Know Details To Be Filled

नीट परीक्षेची उत्तरतालिका मिळवण्यासाठी ३० लाखांची डील ठरली होती. त्यातील १० लाख रुपये परीक्षा झाल्यावर देण्यात येणार होते. विद्यार्थिनी दिनेश्वरीच्या काकांना परीक्षा केंद्राबाहेरून ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतेवेळी त्यांच्या हातात १० लाख रुपयांची रक्कम आढळली होती.

नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट युजी २०२१ परीक्षा रविवारी पार पडण्यात आली होती. ही परीक्षा देशभरातील आणि परदेशातील २०२ शहरातील केंद्रांवर घेण्यात आली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी