32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजपहा कसे साजरे झाले होळकर राजघराण्यांच्या ज्येष्ठा गौरीचे पुजन

पहा कसे साजरे झाले होळकर राजघराण्यांच्या ज्येष्ठा गौरीचे पुजन

टीम लय भारी

इंदौर : इंदौर येथील होळकर राजवाड्यातील मल्हारी मार्तंड मंदिरात गौरीची स्थापना करुन पुजन करण्यात आले. होळकर राजघराण्यांचे उत्सव सर्वसाधारण पध्दतीने साजरे होत असून कुलोपाध्याय श्री. लिलाधर वारकर गुरुजी यांनी परिवारासह गौरीचे पुजन केले (Holkar Palace in Indore Gauri was established and worshiped).

सुभेदार मल्हारराव होळकरांचे ऐकले असते तर पानिपत जिंकले असते

Ahilyadevi Holkar statue at Solapur University : गोपीचंद पडळकर यांचा संकल्प, सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा सर्वात मोठा पुतळा उभारणार

Holkar Palace in Indore Gauri was established and worshiped
कुलोपाध्याय श्री. लिलाधर वारकर गुरुजी यांनी परिवारासह गौरीचे पुजन केले

होळकर राजघराण्यांची ही परंपरा सर्वात जुनी असून गौतमाबाई, अहिल्यादेवी यांच्या काळात हा उत्सव मोठ्या स्वरुपात साजरा केल्या जात असे. संपूर्ण इंदौर राजवाड्याला सजावट केली जात असे ठिकठिकाणी तोरण बांधली जावून फुलांच्या माळा तसेच गौरीचे मखर उच्च वस्त्राने सजवुन शाही आभुषणाने गौरीला सजवले जात असे. गौरीसमोर धन्य धान्य फळ विविध व्यंजन तसेच हिरे माणिक मोत्याची रास असायची (Holkar dynasty and it was celebrated on a large scale during the time of Gautamabai and Ahilya Devi).

Holkar Palace in Indore Gauri was established and worshiped
गौतमाबाई, अहिल्यादेवी यांच्या काळात हा उत्सव मोठ्या स्वरुपात साजरा केल्या जात असे

थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या सौभाग्यवती श्रीमंत गौतमाबाई साहेब होळकर यांनी इंदुर येथील प्रशस्त व शाही राजवाडा वास्तू पुजनानंतर गौरी स्थापना व पुजन सणाची सुरवात केली होती. यासाठी त्यांना आपल्या माहेराहुन अर्थात तळोदे येथून गौरी प्रतिमा आई-वडील यांच्या कडुन मिळाल्या होत्या. जहागीरदार भोजराज बारगळ यांनी लाडक्या कन्येसाठी खास गौरी पाठवून होळकर राजघराण्यांच्या एका उत्सावाला सुरवात केली होती. दि.14 सप्टेंबर रोजी सकाळी राजवाड्यातील कमल कुंडात श्रीगणेश मुर्तीचे विसर्जन होवून दूपारी गौरीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

धनगर आरक्षण कृती समितीचा ठराव : ठाकरे सरकारने केंद्राला आरक्षणाची शिफारस करावी, मोदी सरकारने ते अंमलात आणावे

Kinshuk Vaidya opts out, Gaurav Amlani joins Punyashlok Ahilyabai to play the grown-up Khanderao Holkar

ही परंपरा अजुनही राजवाड्यात सुरू असून स्वरूप मर्यादित आहे. होळकरांची गौरी पाहण्यासाठी इंदौर मधील स्त्रिया  आतुर असायच्या काळाच्या ओघात अजूनही दिवसभर महिला या गौरी दर्शनासाठी येत असतात.

वरील माहिती होळकरशाहीचे अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी दिली आहे (Holkar, women still come all day to see the Gauri).

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी