29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रसर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे भाजप करणार आघाडी सरकारविरुद्ध राज्यभर आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे भाजप करणार आघाडी सरकारविरुद्ध राज्यभर आंदोलन

टीम लय भारी

अहमदनगर : ओबीसी समाजाचा विश्वासघात  करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशीही मागणी मुंढे यांनी केली (OBC reservation removing and betraying the OBC community The Bharatiya Janata Party (BJP) will stage a statewide agitation the alliance government).

 

अरुण मुंढे यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे (OBC community Initiate immediate action to collect Imperial data).

नाना पटोले गरजले, OBC आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यात निवडणुका घेण्यास केला विरोध

SEBC : मराठा समाजाला सरसकट OBC कोट्यातून आरक्षण द्या, अन्यथा…

removing OBC reservations BJP against maharshtra government
ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे 15 सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन करणार

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे.विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले.

OBC Reservation : मराठा समाजाला दिलेले आरक्षण चुकीचे, आरक्षणाला आमचा विरोध नाही पण…

Supreme Court delivers big blow to Maharashtra govt, says cannot postpone polls over OBC reservation

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही.ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे 15 सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही श्री.मुंढे यांनी नमूद केले (without OBC reservation Elections will not be held).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी