27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeएज्युकेशनझेड पी शाळेच्या मुलांचा आकर्षक गणवेशाने रुबाब वाढणार.....

झेड पी शाळेच्या मुलांचा आकर्षक गणवेशाने रुबाब वाढणार…..

शालेय शिक्षण विभागाचा कारभार दीपक केसरकर यांच्या हाती आल्यानंतर हा विभाग कात टाकत आहे. राज्यातील विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. शिवाय विद्यार्थांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी एकच पुस्तक ही संकल्पना ते राबवत आहेत. असे असताना एक राज्य एक गणवेश या अंतर्गत राज्यातील झेडपी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा आकर्षक गणवेश मिळणार आहे. आकाशी आणि निळा अशा या रंगातील हा गणवेश आकर्षक तर असेलच, शिवाय या माध्यमातून ही मुले खासगी शाळांच्या मुलांसारखे वावरायला लागतील. त्यांच्या मनातील न्यूनगंड कमी होण्यास हा गणवेश मदत करणार आहे.

हे सुध्दा वाचा:

बिपरजॉय चक्रीवादळाने घेतलं रौद रुप, रेड अलर्ट जारी

शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्यातून मौल्यवान वस्तूंची चोरी

माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी माऊलींच्या वारीत दंग:टाळ मृदुंगाच्या तालावर धरला ठेका

राज्याचे शिक्षण मंत्री केसरकर यांनी, एक राज्य, एक गणवेश असे धोरण ठरवले होते.सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना सारखाच गणवेश आणि बूट देण्याच्या निर्णयाचा राज्य सरकारने फेरविचार करण्याची मागणी शिक्षकांनी केली होती. दरम्यान, शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या एक महिना आधीच शिक्षणमंत्री केसरकर यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे शाळा सुरू होण्यासाठी कमी कालावधी शिल्लक आहे, गणवेशाचा दर्जा; तसेच ‘फिटिंग’वरून भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींचा विचार करता, सरकारने पूर्वीप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि शाळांना गणवेश निवडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी शिक्षण संस्था चालकांमधून करण्यात येत होती. दरम्यान, आजच्या घडीला सरकार फक्त जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गणवेश देणार आहे. त्यानुसार मुलांना आकाशी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पँट, मुलींना आकाशी शर्ट, निळ्या रंगाचे फ्रॉक गणवेश म्हणून मिळणार आहे.या आकर्षक गणवेशामुळे जिल्हापरीषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांचा रुबाब वाढणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी