33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयएकनाथ शिंदेंनी दिले ५१ लाख रुपये

एकनाथ शिंदेंनी दिले ५१ लाख रुपये

टीम लय भारी

गुवाहाटी : गेल्या सात दिवसांपासून महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचे आसाममधील गुवाहाटीत वास्तव्य आहे. याच दरम्यान आसाममधील काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधील ३२ जिल्ह्यांतील ४५ लाखांपेक्षा अधिक लोकांना या पुराचा फटका बसला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता गुवाहाटीत बसलेल्या बंडखोर आमदारांकडून आसामला लाखो रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

याबाबतची अधिकृत माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय.’ अशी माहिती देण्यात आली आहे. आसाममधील मुख्यमंत्री निधीमध्ये ही ५१ लाखांची मदत करण्यात आली आहे.

आसाम येथील करीमगंज, हैलाकांडी आणि कछार जिल्ह्यामध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्हे हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची भयंकर अवस्था झाली आहे. दरम्यान, आज बंडखोर आमदारांचा गट हा गुवाहाटी येथूजन निघणार आहे. पण त्याआधीच त्यांच्याकडून हि मदत जाहीर करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :

राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या आदेशाला शिवसेनेने दिले सर्वोच्च न्यायालयात आव्हान

आमदार फुटला, पण त्याचे फेसबुक चालवणारा शिवसैनिक नाही फुटला

नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंनी लावली भांडणे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी