28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमुंबईराज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या आदेशाला शिवसेनेने दिले सर्वोच्च न्यायालयात आव्हान

राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या आदेशाला शिवसेनेने दिले सर्वोच्च न्यायालयात आव्हान

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रातील सरकार पूर्णतः अस्थिर झाले आहे, असे असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी महाविकास आघाडी सरकारला ही बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश भगतसिंग कोश्यारी यांनी दिले आहेत. परंतु राज्यपालांचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. तर राज्यपालनाकडून बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी इतकी घाई का करण्यात येत आहे? असा प्रश्न देखील शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

राज्यपालांच्या या आदेशाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायलयात आव्हान दिले. याबाबतची याचिका शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज संध्याकाळी पाच वाजता सुनावणी करण्यात येणार आहे. त्याआधी दुपारी ३ वाजेपर्यंत यासंदर्भातील सर्व कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

मंगळवारी भाजपने राज्यपालांकडे अविश्वासदर्शक ठरावाची मागणी केली. त्यानंतर राज्यपालांनी लगेच गुरुवारी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले. अशा प्रकारे तातडीने बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश देणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे याप्रकरणी लवकर सुनावणी करण्यात यावी असा युक्तिवाद सेनेचे याचिकाकर्ते मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. त्यामुळे आता शिवसेनेकडून न्यायालयात कागदपत्र दाखल केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता या प्रकारणाची सुनावणी न्यायालयाकडून करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा :

आमदार फुटला, पण त्याचे फेसबुक चालवणारा शिवसैनिक नाही फुटला

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे पती सदानंद सुळेंशी भांडण झाले तर…

सदा सरवणकर म्हणाले, मी भाजपला ओळखत नाही

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी