30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयमोठा भाऊ म्हणून मी पंकजासोबत, धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना भावनिक पाठींबा

मोठा भाऊ म्हणून मी पंकजासोबत, धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना भावनिक पाठींबा

टीम लय भारी

मुंबई :- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली(Pankaja Munde contracted corona). त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच त्यांचे मोठे बंधू आणि समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना भावनिक साद घातली आहे (Big brother and Social Welfare Minister Dhananjay Munde has made an emotional appeal to Pankaja Munde).

पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच त्यांचे बंधू आणि समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे(As soon as Pankaja Munde came to know that he was infected with corona, his brother Minister Dhananjay Munde appealed to him to take care of him). “प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट 

“पंकजाताई, #COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” अशी पोस्ट धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) टाकली आहे.

मोठा भाऊ म्हणून मी पंकजासोबत, धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना भावनिक पाठींबा

पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण 

दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांना ही कोरोनाची लागण झाली आहे.

सातारा जिल्ह्यात भयानक परिस्थिती, बेड मिळेनात म्हणून रूग्णांची रस्त्यावर प्रतिक्षा

देशात परिस्थिती गंभीर; आता भाजपचे पुढारी कोणाचे राजीनामे मागणार? सेनेचा सवाल

Coronavirus: Do not seize oxygen cylinders or medicines from patients in need, HC tells Delhi Police

पंकजा मुंडे यांचे ट्वीट 

माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केले होते. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे.

प्रितम मुंडे यांना कोरोनाची लक्षणे

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप खासदार प्रितम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती. बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबईला परतल्यावर त्यांना त्रास जाणवायला लागला. त्यांनी आपली RTPCR कोरोना चाचणी केली होती. पंरतु, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्या घरीच विलगीकरणात थांबल्या होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी काही टेस्ट करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली होती.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी