आपल्या महाराष्ट्राचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी आहे. महाराष्ट्रात शहरी भागात जेवढ्याप्रमाणात सिमेंट काँक्रीटचं जंगल आहेत, तेवढ्याच प्रमाणात महाराष्ट्राने निसर्गाशी असलेलं आपलं नातं जपलं आहे. एकीकडे महाराष्ट्रावर निसर्गाची जी कृपा आहे, ती कधी आपल्या मंजूळ सुरावटींमधून तर कधी आकर्षक रंगांतून अधोरेखित करण्याचे काम करतात ते अनेक प्रकारचे पक्षी. याच पक्ष्यांबद्दलची आवड आणि प्रेमामुळे, महाराष्ट्राचे हरेश शहा यांनी एक महाकाय बर्ड फीडर तयार केले आहे. त्यांचे हे पक्षीप्रेम समाजासाठी आदर्श ठेवणारे आहे.
पक्ष्यांसाठी असणारे एक मानक बर्ड फीडर काही मूठभर धान्य सामावून घेऊ शकतो आणि ते सहसा एका वेळी फक्त काही पक्ष्यांना खाण्यास वापरता येतो. तथापि, महाराष्ट्रातील नाशिक येथील पीपुल गावातील रहिवासी हरेश शहा यांनी बनवलेल्या बर्ड फीडरमध्ये 700 किलो धान्याची साठवण करता येते आणि एकाच वेळी 108 पक्ष्यांना याचा उपभोग घेता येणार आहे. दरम्यान, शाह यांनी 3,80,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह हा जगातील सर्वात मोठा बर्डफिडर बनवला आहे. एकाच वेळी 108 पक्षी सामावून घेणाऱ्या या महाकाय बर्डफीडरची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने देखील नोंद केली आहे.

या बर्ड फीडरचे वैशिष्ट म्हणजे हे पुनर्वापर करता येणाऱ्या साधनसामग्री पासून बनवले गेले आहे. त्यामुळे हे दीर्घकाळ टिकण्याची हमी देते. त्याचप्रमाणे, गतवर्षी 4 एप्रिल रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने याची दखल घेलती होती. तसेच द बेटर इंडिया यांनी शाह यांच्या प्रभावी कार्याबद्दल एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आपल्या शेतात बाजारातून विकत घेतलेले काही फीडर बसवल्यानंतर आणि अधिकाधिक पक्षी येताना पाहून मला ते बनवण्याची प्रेरणा मिळाली, असे यावेळी शहा यांनी नमूद केले.
Owing to his passion and love for birds, Maharashtra’s Haresh Shah made the world’s biggest #birdfeeder that can hold 700 kg grains with an investment of Rs 3,80,000.
It’s now listed in the #GuinnessBook of World Records.#WorldRecord #Biggest #Passion #BirdLover #Inspiration pic.twitter.com/Hk4HS8lMRQ— The Better India (@thebetterindia) January 23, 2023
द बेटर इंडियाच्या वृत्तानुसार, शाह याआधी ज्वेलरी स्टोअरमध्ये काम करत होते. परंतु 2014 मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि विशेष पक्षी फीडर आणि घरटी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. शहा यांच्या वेबसाइट amijivdaya.com वरून बर्ड होम, बर्ड वॉटर होल्डर, स्पॅरो होम आणि बर्ड फूड यासारख्या उत्पादनांची खरेदी करता येते.
याआधी, जगातील सर्वात मोठा बर्ड फीडर असण्याचा विक्रम अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया येथील विल्यम “डॅन” ग्रीनच्या नावावर होता. ग्रीन या सेवानिवृत्त शाळेतील शिक्षकाने 345 किलो धान्य साठवून ठेऊ शकेल असा बर्ड फीडर बनवला.
हे सुद्धा वाचा : VIDEO : पक्षी v आकाराच्या थव्याने का उडतात ?
जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती सिस्टर आंद्रे यांचे वयाच्या 118 व्या वर्षी निधन
ऐकावे ते नवलच, नापास केले म्हणून विद्यार्थ्यांनी मास्तरांनाच धुतले