32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeक्रिकेटरोहितची बॅट तळपली; विराटला मागे टाकत IPL मध्ये केला नवा विक्रम

रोहितची बॅट तळपली; विराटला मागे टाकत IPL मध्ये केला नवा विक्रम

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या कालच्या रोमांचक सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. या सामन्यात रोहितने 45 चेंडूत 65 धावा करताना 4 षटकार आणि 6 चौकार लगावले. विशेषतः रोहितचे आयपीएल मध्ये हे 41 वे अर्धशतक आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या कालच्या सामन्यात हे अर्धशतक झळकवताना रोहितने विराट कोहलीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. रोहितने 45 चेंडूत 65 धावा केल्या आहेत. दरम्यान दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाजाच्या यादीत रोहितने उच्चांकी गाठली आहे. पूर्वी या विक्रमाची नोंद विराट कोहलीच्या नावावर होती. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध 925 धावा केल्या आहेत. तर रोहित 977 धावा करून पहिल्या क्रमांकावर गड राखून ठेवला आहे. त्याचप्रमाणे रहाणे 792 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहितची बॅट तळपली हे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. कारण पहिल्या दोन पराभवांच्या झटक्यानंतर मुंबई इंडियन्सने जोरदार कमबॅक केले. मंगळवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेटस्नी हरवून यंदाच्या पहिल्या विजयाची नोंद केली. शेवटच्या षटकात 6 चेंडूंत 5 धावांची गरज असताना एन्रिक नोत्झने टिच्चून मारा करीत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना लांबवला, परंतु, टीम डेव्हिडने शेवटच्या चेंडूवर दुहेरी धाव घेत विजय मुंबईच्या नावावर केला. रोहित शर्माची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली, त्याने 45 चेंडूंत 65 धावा केल्या. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग चौथा पराभव आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (51) आणि अष्टपैलू अक्षर पटेल (54) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध 19.4 षटकात सर्वबाद 172 धावा केल्या. पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीनंतर कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने शेवटच्या चेंडूवर विजयी लक्ष्य गाठले.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आज आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघाचे आज लय रखायचे लक्ष्य असून आज सायंकाळी साडेसात वाजेपासून ही चुरस रंगेल. मुख्यतः चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आज मैदानावरील 200व्या सामन्याची खेळी असल्याने आजचा हा सामना चाहत्यांसाठी अतिशय महत्वाचा बनला आहे.

हे सुद्धा वाचा:

MI vs DC: दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ‘फ्लॉप गेम’ बदलणार?

IPL 2023: गरिबाच्या पोराची कमाल; 5 चेंडूंवर 5 षटकार मारत रिंकू ठरला KKRचा हिरो

पॉइंटस् टेबल आयपीएल : RR अव्वल, KKR दुसऱ्या स्थानी

IPL 2023, Rohit Sharma, Virat Kohli, Rohit Sharma surpasses Virat Kohli to create a new record in IPL 2023

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी