33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनऐश्वर्या रायबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे अपशब्द

ऐश्वर्या रायबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे अपशब्द

देशात आयसीसी वर्ल्डकप (ICC World cup) सुरू आहे. हा वर्ल्डकप आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या (१९ नोव्हेंबर) दिवशी अंतिम सामना होणार आहे. जसजसा वर्ल्डकप अंतिम टप्प्यात येत आहे. वर्ल्डकपमध्ये काही ना काही ट्वीस्ट घडत आहेत. या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ पराभव झाल्याने संघाचा संघनायक बाबर आझमला धारेवर धरले आणि यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर पाकिस्तानी माजी खेळाडूंनी आवाज उठवला आहे. यावेळी पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रझाक (Abdul Razzaq) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत बोलत असताना अभिनेत्री ऐश्वर्या रायशी लग्न करण्याबाबत (Aishwarya Rai) उदाहरण देत वक्तव्य केले होते. यामुळे केवळ भारतीय नाही तर आता पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तरने रझाकला टार्गेट केले आहे.

काय म्हणाले रझाक?

पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटर अब्दुल रझाक अनेकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने अनेकदा टीम इंडियाच्या खेळाडूंवर वक्तव्य केली आहेत. त्याच्या वक्तव्यामुळे रझाक नेहमी चर्चेत असतो. तर कधी संकटात सापडतो. यावेळी त्याने तथ्य नसलेल्या बाबीचे उदाहरण देत ऐश्वर्या रायवर एक टीप्पणी केली आहे. सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर तो म्हणाले की, ‘चांगली कामगिरी करण्यासाठी संघाचा हेतू योग्य असावा. समजा मी जर ऐश्वर्या रायसोबत लग्न केलं आणि चांगली मुले व्हावीत असा विचार केला तरीही तसे होत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा हेतू सेट करावा लागेल’, असे रझाक म्हणाला. मात्र त्यानंतर याबाबत त्याने माफी मागत दिलगिरी व्यक्त केली.

हे ही वाचा

भाऊबीज म्हणजे बहीण-भावातील नात्याचा गोडवा

‘छगन भुजबळांना मतदान करणार नाही’

वडेट्टीवारांना धमकीचे फोन; सरकारकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी

रज्जाकने व्हिडीओवरून वैयक्तिक ऐश्वर्या रायची माफी मागितली आहे. मला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मी कोचिंगबद्दल आणि खेळाबद्दल बोलत असताना मी चुकून ऐश्वर्या रायचे नाव घेतले. मी व्यक्तीगत त्यांना माफी मागतो, असा माफीनामा रझाकने आपल्या व्हिडीओद्वारे केला.

दरम्यान, पाकिस्तान संघ वर्ल्डकपमध्ये खेळत असताना अंतिम सामन्यापर्यंत आपले स्थान राखून ठेवेल असे अनेकांना वाटत होते, मात्र तसं झाली नाही. मात्र याउलट पाकिस्तानने एकूण ९ सामन्यातून केवळ ४ सामन्यात विजय मिळवला. यामुळे पाकिस्तान संघ आणि बाबर आझम यांचे स्वप्न भंगल्याचे समजते. यामुळे आता पाकिस्तानचे चाहते निराश झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी