29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्रिकेट'हरभजन सिंहला धर्मपरिवर्तन करायचे होते'; पाकिस्तानी माजी क्रिकेटरचे वक्तव्य

‘हरभजन सिंहला धर्मपरिवर्तन करायचे होते’; पाकिस्तानी माजी क्रिकेटरचे वक्तव्य

भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश आपापल्या बाजून एकमेकांविरोधात टीका करत असतात. मात्र बऱ्याचदा पाकिस्तानच्या बोलण्यात कोणतेही तथ्य नसल्याचे अनेकदा पाहायला मिळते. पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रझाकने भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत लग्न करण्याबाबत एका मुद्द्यावरून उदाहरण देत वक्तव्य केले. यामुळे रझाकने याबाबत माफी मागितली आहे. मात्र भारताच्या विजयावर, खेळीवर पाकिस्तान संघ नेहमीच प्रश्न उपस्थित करतो. हे केवळ आजपासून नाही तर गेली अनेक वर्षांपासून हे पाहायला मिळत आहे. तेच आजही भारतीय संघाला तसेच भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंहला भोगावे लागले आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू इंजमाम उल हकने (Injamam Ul Hak) हरभजन(Harbhajan Singh) धर्मपरिवर्तन करण्याबाबत वक्तव्य केले आहे. यामुळे आता तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून वाद आहे. मात्र टीम इंडिया क्रिकेटचा मान सन्मान करत पाकिस्तानशी वाद घालत नाही. मात्र दुसरीकडे पाकिस्तान भारताच्या विजयावर नेहमी बोट करत असतो. शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या गोलंदाजाने टीम इंडियाला चेंडू बदलून मिळत असावा असे वक्तव्य केले. तसेच पकिस्तानी माजी खेळडू रझाकनेही अभिनेत्री ऐश्वर्या रायबाबत वक्तव्य केले. यानंतर लगेचच पाकिस्तानचा माजी खेळाडू इंजमाम उल हकने हरभजन सिंह धर्मांतरन करणार असल्याचे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होऊ लागला आहे. यामुळे आता आधिकच वातावरण पेटले आहे.


काय म्हणाला इंजमाम?

सोशल मीडियावर इंजमामने हरभजनच्या धर्मपरिवर्तनावर भाष्य केले, इंजमाम उल हक म्हणाले की, हरभजन मौलानाचे सर्व ऐकत असत. ते जे काही बोलायचे त्या गोष्टी तो पालन करायचा. यासह त्यांनी इरफान पठाण, मोहम्मद कैफ, झहीर खान नमाज पाडण्यासाठी पाकिस्तानी संघ जिथं नमाज पडायचा तिथंच भारतीय खेळाडू येत असत. भज्जीचा मौलानावर प्रभाव होता. त्याला त्याच्यासारखे व्हायचे होते. थोडक्यात भज्जीला शिख धर्म सोडून धर्मपरिवर्तन करायचे होते, असे वक्तव्य इंजमामने केले आहे.

यावर आता हरभजन सिंहने संताप व्यक्त करत इंजमामची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. हरभजनने व्हिडीओवर इंजमामने केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. हरभजन म्हणाले की, हा कोणती नशा घेत आहे. हा काय बोलत आहे. मला अभिमान आहे भारतीय असल्याचा आणि मी शिख असल्याचा, ही लोकं काहीही बोलत राहतील, असा पलटवार करत हरभजनने इंजमामचे कान टोचले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी