28 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांच्या आयुष्यावर चित्रपट? आमिर साकारणार भूमिका..

ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांच्या आयुष्यावर चित्रपट? आमिर साकारणार भूमिका..

बऱ्याच काळापासून ब्रेकवर असलेल्या अमीर खानने आता पुन्हा चित्रपटाच्या तयारीसाठी हालचाली सूरु केल्या आहेत.
आमिर खान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आत्मचरित्रावर काम करत असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अविनाश अरुण चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. याबाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, आमीर गेल्या महिन्यापासून नव्या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. सध्या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन चालू आहे. चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत असेल. चित्रपटाचे नाव अद्यापही ठरलेले नाही.

आमिर दिनेश विजनसोबत चित्रपटाची सह-निर्मिती करणार आहे. पाताल लोक, स्कूल ऑफ लाईज आणि किल्लासाठी ओळखले जाणारे अविनाश अरुण चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतील. मात्र कुठेही याबाबतीत माहिती फुटू नये, यासाठी खास काळजी घेतली जात आहे. ही माहिती बाहेर येताच अविनाश अरुण यांनी आश्चर्य व्यक्त केले.हिमालयन फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने, अविनाशने पत्रकारांशी बोलताना सांगितले की,”चित्रपट अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि आतापर्यंत आम्ही चर्चेच्या माध्यमातून काहीही ठोस साध्य केलेले नाही. चित्रपटाची निर्मिती खरोखरच सुरुवातीच्या चर्चेच्या टप्प्यावर आहे. काहीही ठोस नाही.” याबद्दल तपशीलवार माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता आमिर खानने आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला. आमीर खान शेवटचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात करीना कपूर खान सोबत दिसला होता. अद्वैत चंदनने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९९४ च्या हॉलिवूड क्लासिक फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

हे ही वाचा 

‘या’ हवालदारानं सलमानविरोधात साक्ष दिली… मात्र त्यांचा अंत फारच दुर्दैवी ठरला

कंगना रनौतची अबू सालेम सोबत मैत्री?

जॅकलीन चालली हॉलिवूडला! सोशल मीडिया पोस्ट चर्चेत…

आमिर खानची मुलगी इरा खान आपल्या प्रियकर नुपूर शिखरे सोबत पुढील वर्षात जानेवारीत विवाहबद्ध होणार आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इरा आणि नुपूर यांचा साखरपुडा झाला होता. एरवी प्रसार माध्यमांपासून लांब राहणाऱ्या इरानं स्वतःहूनच समोर येत आपण जानेवारी महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)


येत्या जानेवारी महिन्यात राजस्थान येथील उदयपूर येथे दोघंही विवाहबद्ध होतील. 3 जानेवारी रोजी दोघांचं लग्न होईल. इरा मुस्लिम तर नुपूर मराठी आहे. लग्न कोणत्या पद्धतीत होईल याबाबत इराण माहिती नाही दिली. तीन दिवस लग्न सोहळा सुरू राहील. आमीर सध्या मुलीच्या लग्नाच्या तयारीच्या गडबडीत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी