25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजन'या' हवालदारानं सलमानविरोधात साक्ष दिली... मात्र त्यांचा अंत फारच दुर्दैवी ठरला

‘या’ हवालदारानं सलमानविरोधात साक्ष दिली… मात्र त्यांचा अंत फारच दुर्दैवी ठरला

१० डिसेंबर २०१५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानची नुरुल्ला शरीफ नावाच्या व्यक्तीचा हिट अँड रन घटनेत १३ वर्षांनंतर सुटका केली. फिर्यादीचा खटला फेटाळताना, न्यायाधीश ए.आर. जोशी यांनी मुंबई पोलीस हवालदार रवींद्र पाटील यांनी दिलेले वक्तव्यही फेटाळून लावले आणि त्यांना ‘संपूर्ण विश्वासार्ह साक्षीदार’ मानले जाऊ शकत नाही, असे सांगितले. मुंबई सत्र न्यायालयाने मे 2015 मध्ये 2002 च्या हिट अँड-रन प्रकरणात एका व्यक्तीची हत्या आणि इतर चार जणांना जखमी केल्याबद्दल अभिनेत्याला दोषी ठरवले होते. या संपूर्ण वादात पोलिस हवालदार रवींद्र पाटील यांनी निर्भीडतेने सलमान विरोधात साक्ष दिली. त्यांचे प्रचंड कौतुकही झाले. मात्र ‘हिट एन्ड रन’ केस ते १३ वर्षांच्या प्रतीक्षेदरम्यानचं ३ ऑक्टोबर २००७ रोजी रवींद्र पाटील यांचा दुर्दैवी अंत झाला.

सलमान खान आणि वाद यांचं नातं फारच घट्ट आहे. काळवीट शिकार, माजी प्रेयसी ऐश्वर्या रायला मारहाण, विवेक ओबेरॉयला फोनवर धमक्या देणं या सर्वात मद्यधुंद अवस्थेत सलमाननं चार जणांना गाडीखली चिरडण्याची घटना सर्वात वादग्रस्त ठरली. या अपघातात नुरुल्ला शरीफ नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सलमान खानचा बॉडीगार्ड रवींद्र पाटीलनं थेट सलमानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

या कारणामुळे रवींद्र पाटील यांना सलमानच्या बॉडीगार्डची जबाबदारी मिळाली

घटनेच्या वेळी सलमानला अंडरवर्ल्डकडून धमक्या येत होत्या. पोलिसांकडून हवालदार रवींद्र पाटील यांना सलमान खानचा अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

१९९८ च्या बॅचचे हवालदार, पाटील यांनी मरेपर्यंत सातत्याने सांगितले की ते अपघाताच्यावेळी गाडीत सलमानच्या शेजारी बसले होते. सलमान नशेत गाडी चालवत होता. सलमानने दारूचे सेवन केल्याने आपण त्याला गाडी चालवू नका अशी विनंतीही केली होती. मात्र सलमानने ऐकले नाही असेही रवींद्र आपल्या न्यायालयीन जबानीत म्हणाले. त्यांनीच पोलिस ठाण्यात सलमानविरोधात तक्रार नोंदवली.

हे ही वाचा

‘द व्हॅक्सीन वॉर’कडे प्रेक्षकांची पाठ

कंगना रनौतची अबू सालेम सोबत मैत्री?

जॅकलीन चालली हॉलिवूडला! सोशल मीडिया पोस्ट चर्चेत…

पाटील यांच्यावर अभिनेत्याविरोधातील विधान बदलण्यासाठी प्रचंड दबाव होता आणि खटल्यादरम्यान ते बेपत्ताही झाले होते. खानच्या वकिलांना टाळण्यासाठी आणि सतत होणारा छळ टाळण्यासाठी तो अज्ञातवासात गेला होता.

२००६ साली साक्षीदार म्हणून हजर न राहिल्यामुळे पाटील यांना अटक करण्यात आली. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना पोलिस दलातून काढून टाकण्यात आले. २००७ साली पाटील शिवडीजवळ रस्त्यावर सापडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी पाटील यांना क्षयरोगाचे निदान झाले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना क्षयरोगाचा आजार झाला होता. पाटील यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सोडून टाकले. रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी