35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमनोरंजनApple सीईओने माधुरी दीक्षितसह घेतला मुंबईच्या वडापावचा आस्वाद!

Apple सीईओने माधुरी दीक्षितसह घेतला मुंबईच्या वडापावचा आस्वाद!

Apple या जगप्रसिद्ध कंपनीने आज भारतात पहिले Apple Store लाँच केले आहे. Apple ने भारतात 25 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर पहिले स्टोअर लॉन्च केले आहे. दरम्यान ॲपलचे सीईओ भारत दौऱ्यादरम्यान अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगातील नेत्यांना भेटणार आहेत. नुकतेच अभिनेत्री माधुरी दीक्षितने त्यांची भेट घेतली. नवल म्हणजे माधुरीने टीम कूक यांना मुंबईचा प्रसिद्ध वडापाव खाऊ घातला आहे. या दोघांचाही वडापाव खातानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

माधुरीने टीम कूक यांच्यासोबत वडापाव खातानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने मुंबईत आल्यावर वडापावने स्वागत करण्यापेक्षा आणखी काहीच चांगले असू शकत नाही. फोटोमध्ये टीम यांनी पांढऱ्या रंगाचा टीशर्ट परिधान केला आहे. तर माधुरीने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला आहे. त्या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीम यांनी माधुरीचे हे ट्वीट रिट्वीट केले आहे. ‘मला पहिला वडापाव खायला घातल्याबद्दल माधुरी दीक्षित तुझे मनापासून आभार. खूप चविष्ठ होता’ असे कॅप्शन टीम यांनी दिले आहे. टीम आणि माधुरी मुंबईतील अतिशय लोकप्रिय स्नॅक्स कॉर्नक स्वाती येथे जाऊन वडापाव खात होते. दरम्यान, टीम भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनाही भेटतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच टीम कुक यांचा हा भारत दौरा खास असणार आहे यात काहीच शंका नाही.

त्याचप्रमाणे, आयफोन निर्माता कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी मुंबईत Apple BKC स्टोअरचे आज उद्घाटन केले. मात्र हे उद्घाटन करताना कोणतीही रिबिन कात्रण न करता कुक यांनी फक्त ॲपल स्टोअरचा दरवाजा उघडून या स्टोअरचे लोकार्पण केले आहे. Apple ने भारतात 25 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर पहिले स्टोअर लॉन्च केले आहे. मुंबईनंतर दिल्लीमध्ये भारतातील दुसरे ॲपल स्टोअर उघडणार आहे. 20 एप्रिल रोजी हा लोकार्पण पार पडेल. भारतात ॲपल स्टोअर सुरू झाल्यानंतर आता ग्राहकांना कंपनीच्या उत्पादनांचा आणि सेवांचा थेट लाभ मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा: 

माधुरी दीक्षितवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या नेटफ्लिक्सला चाहत्याची कायदेशीर नोटिस!

जागतिक वडापाव दिन : जाणून घ्या कसा तयार झाला पहिला वडापाव

चॅटजीपीटी एआय चॅटबॉट्समुळे Gmailच्या शेवटाची घटिका समीप; जीमेल निर्माते पॉल बुचेट यांचा महाभयंकर इशारा

Apple CEO, tim Cook, Madhuri Dixit, vada pav, mumbai apple store,  Apple CEO with Madhuri Dixit tasted Mumbai’s vada pav

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी