28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeटेक्नॉलॉजीचॅटजीपीटी एआय चॅटबॉट्समुळे Gmailच्या शेवटाची घटिका समीप; जीमेल निर्माते पॉल बुचेट यांचा...

चॅटजीपीटी एआय चॅटबॉट्समुळे Gmailच्या शेवटाची घटिका समीप; जीमेल निर्माते पॉल बुचेट यांचा महाभयंकर इशारा

जीमेल, फोटोज आणि ड्राईव्हचा बॅकअप घेऊन ठेवा; एखाद्या दिवशी जीसूट अचानक गंडले तर होऊ शकतो मोठा डेटा लॉस 🖰 🖰 जीमेल बनविणाऱ्या पॉल बुचेटच्या इशाऱ्यानुसार फक्त एक किंवा दोन वर्षात ही भयंकर स्थिती उद्भवू शकते. 🖰 🖰 पॉल बुचेट हा Google मध्ये नियुक्त केलेला 23वा कर्मचारी होता. तो एक आघाडीचा संगणक अभियंता आहे. त्यानेच कंपनीचा पहिला AdSense प्रोटोटाइप विकसित करण्यात मदत केली.

चॅटजीपीटी एआय चॅटबॉट्समुळे जीमेलच्या शेवटाची घटिका समीप आली आहे. खुद्द जीमेल निर्माते पॉल बुचेट यांनी हा महाभयंकर इशारा दिला आहे. बरं ही शक्यता काही फार दूरच्या काळातील नाही, जीमेल बनविणाऱ्या पॉल बुचेटच्या इशाऱ्यानुसार फक्त एक किंवा दोन वर्षात ही भयंकर स्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जीमेल, फोटोज आणि ड्राईव्हचा बॅकअप घेऊन ठेवा. अन्यथा, एखाद्या दिवशी जीसूट अचानक गंडले तर मोठा डेटा लॉस होऊ शकतो.

भविष्यात सर्वच क्षेत्रांना ChatGPTसारख्या AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ताधारक (आर्टीफिशिअल इंटेलिजन्स) ChatBotsचा धोका असल्याचा पॉल बुचेटचा दावा आहे. त्यांच्या मते ChatGPTसारख्या AI च्या प्रगतीमुळे नेक्स्ट लेव्हल, नेक्स्ट जनरेशन झालेल्या सुपरफास्ट चॅटबॉट्समुळे Googleचे सर्च इंजिनच धोक्यात येऊ शकते. कोणतीही वेबसाईट डब्यात घालू शकणारे चॅटबॉट्स हे गुगल सर्च रिझल्टस् मध्ये व्यत्यय आणू शकतात. कदाचित त्यांना अप्रासंगिक आणि असंबंधितसुद्धा करू शकतात. ज्या पद्धतीने टेलिफोन डिरेक्टरी आणि यलो पेजेसचा नव्या पिढीतील सर्च इंजिननी सत्यानाश केला; तेच आता चॅटबॉट्ससुद्धा गुगलसंदर्भात करू शकतात.

बुचेट यांनी बुधवारी ट्विट करून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि चॅटजीपीटीसारखे चॅटबॉट्स यांच्यामुळे भविष्यात निर्माण होणारा सायबर जगतातील असमतोल आणि महाभयंकर धोका याची थेट शब्दात जाणीव करून दिली. एआय चॅटबॉट्स हे गुगल ज्यातून सर्वाधिक महसूल कमावतो, ते सर्च इंजिन रिझल्टस् पेजच प्रभावित करू शकतात, नष्टही करू शकतात. अफाट तंत्रज्ञानाची गंगाजळी असलेल्या गुगलने या हल्लेखोर आणि टवाळखोर चॅटबॉट्सना जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना त्यांच्या व्यवसायातील सर्वात मौल्यवान भाग असलेले जीमेल व इतर काही डेटा नष्ट होण्याचा धोका राहतोच. ही हॅकर्सची नवी पिढी आहे, अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातील नाक्यावरील टपोरी गॅंगसारखे चॅटबॉट्स हे सायबर विश्वात धुमाकूळ माजवणारे सायबर रोमिओ ठरू शकतात. विध्वंस करायला त्यांना मजा येईल. डेटावर हल्ला करून तो नष्ट करणे, चोरणे, त्याचा गैरवापर करणे असले सारे प्रकार भविष्यात आपल्यासमोर वाढून ठेवलेले असू शकतात.

अर्थात, चॅटजीपीटी स्वतःच काही Google च्या मक्तेदारीला बाधाआणू शकत नाही. मात्र, मक्तेदारी संपुष्टात येणार हे नक्की. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लोकांच्या माहिती मिळविण्याच्या पद्धती बदलत जातील, अधिक सोप्या होतील, असेल असे खुद्द जीमेलचा निर्माता पॉल बुचेट यानेच म्हटले आहे. वेब 3.0 वैगेरे लिनक्स सारख्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मनी आधीच ई-विश्व बदलून टाकले आहे. त्यामुळे भविष्यात गुगल, मेटा (फेसबुक), मायक्रोसॉफ्ट, अॅपल अशी कुणाचीची मक्तेदारी राहणार नाही. सध्याचे क्रिएटर रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल बदलेल.

पॉल बुचेटचे 1 डिसेंबर 2022 रोजीचे जुने ट्विट

पॉल बुचेट सांगतो, “सध्या आपण ब्राउझरच्या URL किंवा सर्च बार मध्ये वेबसाईट पत्ता किंवा विचार/प्रश्न टाईप करतो. त्यासाठी वेळ लागतो. AIने मात्र आपल्या मनातील विचार/प्रश्न आपोआप टाईप होऊन पूर्ण केला जाईल आणि सर्वोत्तम उत्तर (रिझल्ट) देखील मिळेल. हे उत्तर म्हणजे वेबसाइट किंवा उत्पादनाची लिंक असू शकते. मनुष्याला जे काम करायला काही मिनिटे लागटात, ते गुगल सारख्या सर्च इंजिनचा वापर करून एआय झटपट करण्यास सक्षम असेल.”

ChatGPT कोडिंग सल्ला देण्यापासून निबंध लिहिणे ते काहीही करण्याची क्षमता ठेवतो. तो उत्कृष्ट हेडिंग देऊ शकतो. हा एक अस AI चॅटबॉट आहे, जो लाखो वेबसाइटवरून क्षणार्थात गोळा केलेल्या डेटाचा वापर, विश्लेषण करून स्पष्टपाने, थेट संभाषणात्मक पद्धतीने आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. अर्थात ते अजून पूर्णत: परिपूर्ण नाही. काही वेळा चुकीची किंवा यासंबंध उत्तरे दिली जातात. त्यांचे माहिती 2021 पर्यंत तशी अद्ययावत आहे. मात्र, नंतरच्या माहितीचे आकलन आणि विश्लेषणात अजून या चॅटबॉटला अडचणी येतात. त्यामुळे चुकीची माहिती ओळखण्यात गल्लत होते.

क्रंचबेस माहितीनुसार, पॉल बुचेट हा Google मध्ये नियुक्त केलेला 23वा कर्मचारी होता. तो एक आघाडीचा संगणक अभियंता आहे. त्यानेच कंपनीचा पहिला AdSense प्रोटोटाइप विकसित करण्यात मदत केली. ही प्रणाली वेबसाइट्सवर लक्ष्यित जाहिराती देते आणि प्रकाशकांना पृष्ठदृश्यांमधून (इम्प्रेशन्स) नफा मिळवून देते. गुगलच्या कमाईचा मोठा हिस्सा जाहिरातींच्या विक्रीतून येतो. त्यापैकी बरेच त्यांच्या सर्च इंजिनवर दिसतात. 2021 मध्ये Googleच्या 257.64 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या कमाईपैकी सुमारे 80% कमाई जाहिरातींमधून आली होती.

हे सुद्धा वाचा : 

मोठी बातमी : अमेरिकेवर सायबर हल्ला, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण हवाई सेवा ठप्प!

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेवेळी सायबर हल्ला

भारतात येणार कॅन्सर त्सुनामी; कर्करोगतज्ज्ञ डॉ. जेम अब्राहम यांचा इशारा

ChatGPTच्या संभाव्य धोक्याबाबत इशारा देणारा पॉल बुचेटच आहे. चॅटजीपीटीची नवीन आवृत्ती 30 नोव्हेंबर रोजी आल्यानंतर Googleने डिसेंबरमध्ये चॅटबॉटसंबंधी “कोड रेड” इशारा जारी केला होता. ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या वृत्तानुसार, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मूळ कंपनी अल्फाबेटच्या साथीने गुगल सर्च इंजिनला चॅटबॉटपासून असलेल्या धोक्यासंदर्भात गुगलचे एआय धोरण निश्चित करण्यासाठी अनेक बैठकांमध्ये भाग घेतला. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सेर्गे ब्रिन यांनाही या समस्येचे निराकरण करण्यासाठी मदत करण्यास बोलावले गेले होते, असा ‘टाईम्स’चा दावा आहे. ‘द इन्फॉर्मेशन’च्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टने स्वतःचे सर्च इंजिन बिंगला अधिक सक्षम व परिणामकारक करण्यासाठी चॅटजीपीटीसोबत करार केला आहे.

Gmail Creator Paul Buchheit, चॅटजीपीटी एआय चॅटबॉट्स, ChatGPT AI ChatBots, Google Total Disruption, Search Engine Irrelevant

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी