33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमनोरंजनRanbir-Alia Brahmastra Controversy - रनबीर अणि आलियाला उज्जैनमध्ये बंजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हटकले

Ranbir-Alia Brahmastra Controversy – रनबीर अणि आलियाला उज्जैनमध्ये बंजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हटकले

रनबीर कपूर, आलिया भटट आणि ब्रहमास्त्र (Brahmastra) चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीसह आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मंगळवारी उज्जैन शहरात दाखल झाले. स्थानिक पोलिसांनी तिथे विरोध प्रदर्शन करत असलेल्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना लाठीमार करत असतानाचे व्हीडीओ सोशल मीडीयावर वायरल झाले आहेत.

बजरंग दलच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी हींदी चित्रपट अभिनेता रनबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि त्याची अभिनेत्री पत्नी आलिया भटटला (Alia Bhatt) उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिरामध्ये प्रवेश करण्यास विरोध केला. रनबीर कपूर, आलिया भटट आणि ब्रहमास्त्र (Brahmastra) चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीसह आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मंगळवारी उज्जैन शहरात दाखल झाले. स्थानिक पोलिसांनी तिथे विरोध प्रदर्शन करत असलेल्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना लाठीमार करत असतानाचे व्हीडीओ सोशल मीडीयावर वायरल झाले आहेत. पोलिसांनी या दक्ष्रिणपंथी दलाच्या कार्यकर्त्यांविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५३ अन्वये गन्हा दाखल केला आहे.

त्यापैकी एका वायरल व्हीडीओमध्ये एक बजरंग दलचा कार्यकर्ता म्हणत आहे की, जेव्हा आम्हाला असे कळाले की रनबीर कपूर आणि आलिया भटट उज्जैनला येणार आहेत तेव्हा आम्ही शांतीपूर्ण प्रक्रियेने त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध प्रदर्शन करत होतो परंतु पोलिसांनी आमच्यावर लाठीमार केला. रनबीर कपूरने काही वर्षांपूर्वी गोमांस खाणे चांगले आहे आणि गोमुत्राबाबत बदनामीकारक विधान करून आमच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे आम्ही त्यांना मंदिरात प्रवेश करू देणार नाही. ज्यां लोकांना रनबीर आणि आलियाचा ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट पाहायचा आहे त्यांनी पाहावा आणि ज्यांना तो पाहायचा नाही त्यांनी पाहू नये, असेही त्या कार्यकर्त्याने नमूद केले.

हे सुद्धा वाचा –

Asia Cup 2022 : श्रीलंकेशी झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल?

Income tax : महाराष्ट्रातील बलदंड ठेकेदारावर इन्कम टॅक्सची धाड

Municipal Election 2022 : मुंबई महापालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर मध्ये होणार

रनबीर कपूर आणि आलिया भटट जेव्हा महाकाल मंदिरामध्ये दर्शन घेण्याकरिता आले तेव्हा बंजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’ च्या घोषणा दिल्या. रनबीर कपूर आणि आलिया भटटला मंदिरामध्ये दर्शन घेता आले नसले तरी ब्रम्हास्त्र चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने देवाचे दर्शन घेतले अशी माहिती तेथील पुजाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

रनबीर कपूरने गोमांस खाण्याबाबत काय विधान केले होते –

२०११ साली रॉकस्टार चित्रपटाचे प्रमोशन करत असताना एका मुलाखतीत रनबीर सिंग म्हणाला होता की, माझे कुटुंब हे मुळचे पेशावरचे आहे त्यामुळे पेशावरी जेवणाचे पदार्थ मला खूप आवडतात. मला बोकडाचे मांस, पाया आणि विशेषत: गोमांस खूप आवडते. ‘ब्रम्हास्त्र’ प्रदर्शित होण्याच्या काही दिवसांपूर्वी रनबीर कपूरचा तो व्हीडीओ सोशल मिडीयावर वायरल होत असल्यामुळे दक्षिणपंथी विचारसरणीच्या संघटनांकडून रनबीर आणि आलियाच्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटावर बह‍िष्कार करण्याची मागणी केली आहे.

‘ब्रम्हास्त्र’ मध्ये रनबीर कपूर, आलिया भटट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुना अक्कीनेनी आणि डींपल कपाडीया अशा दिग्गज कलाकरांचा समावेश आहे. ब्रम्हास्त्र ९ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आमच्या युट्युब चॅनेलसुद्धा सबस्क्राइब करा –

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी