32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रManikrao Thackeray : 'ते' असा विचार करुच शकत नाही - माणिकराव ठाकरे

Manikrao Thackeray : ‘ते’ असा विचार करुच शकत नाही – माणिकराव ठाकरे

काँग्रेसचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार या अफवांना आता पुर्ण विराम म‍िळणार आहे. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरेंनी त्यांची बाजू उचलून धरली आहे.

काँग्रेसचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार या अफवांना आता पुर्ण विराम म‍िळणार आहे. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरेंनी त्यांची बाजू उचलून धरली आहे. माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) म्हणतात की, ते तर राज्यातील काँग्रेसचे एक नंबरचे नेतृत्व आहे. ते दोन वेळा मुख्यमंत्री होते. प्रांताध्यक्ष होते. असा विचार ते करुच शकत नाही. या बातम्या राजकारण करण्यासाठी विरोधी पक्षातील नेते पसरवत आहेत. त्यांच्या विरोधात अपप्रचार करत आहेत. काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी नुकतीच ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली आहे. ही यात्रा लवकर हिंगोलीमध्ये येणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी माणिराव ठाकरे हे हिंगोलीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले

अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चावर माणिकराव ठाकरे म्हणाले की, काल परवानाच आमची भेट झाली. दिल्लीच्या एका सभेमध्ये काँग्रेसच्या फक्त 10 लोकांना बोलण्याची संधी होती. त्यात अशोक चव्हाण यांचा नंबर होता असे ते महाराष्ट्रातले नेतृत्व आहे. मिशन 2024 लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरूवात केली आहे.

हे सुद्या वाचा

Income tax : महाराष्ट्रातील बलदंड ठेकेदारावर इन्कम टॅक्सची धाड

political party : 138 कोटी लोकसंख्येच्या देशात सुमारे 2044 राजकीय पक्ष

खळबळजनक ! राजकीय क्षेत्रात खळबळ, 100 ठिकाणी इनकम टॅक्सच्या धाडी

कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत ही यात्रा असेल. 150 दिवसांच्या यात्रेत राहूल गांधी 12 राज्यांना भेटी देणार आहेत. राहूल गांधींच्या महाराष्ट्रात दोन सभा होणार आहेत. त्यापैकी एक सभा बुलडाणा मधील जळगाव, जामोद तसेच नांदेडमध्ये होणार आहे. असा माणिकराव ठाकरेंनी अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्रात सद्या गणेशोत्सव सुरू आहे. त्या निम‍ित्ताने नेते मंडळी एकमेकांच्या घरी गणपती पाहण्यासाठी जातात. एका ठिकाणी गणपती पाहण्यासाठी अशोक चव्हाण गेले होते. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. उभ्या उभ्या झालेल्या या भेटीला राजकीय रंग देण्यात आला. उलट सुलट चर्चा रंगल्या आणि तर्क विर्तकांना ऊत आला. स्वत: अशोक चव्हाण यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरेंनी देखील ते पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी