33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeमनोरंजनFilmfare Awards 2023: फिल्म फेअरमध्ये आलियाचा बोलबाला; 'गंगूबाई काठियावाडी'ला तब्बल 10 पुरस्कार

Filmfare Awards 2023: फिल्म फेअरमध्ये आलियाचा बोलबाला; ‘गंगूबाई काठियावाडी’ला तब्बल 10 पुरस्कार

भारतीय कलाकारांसाठी बॉलिवूड विश्वातील सर्वात महत्वाच्या अशा फिल्म फेअर अवार्डचा 68वा भव्यदिव्य सोहळा नुकताच पार पडला. हा दिमाखदार सोहळा शुक्रवारी जिओ कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. मोठ-मोठ्या तसेच नवोदित कलाकारांनी यावेळी हजेरी लावली होती. या शानदार पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन सलमान खान, मनीश पॉल आणि आयुष्मान खुराना यांनी केले. या कार्यक्रमात अनेक तरुण कलाकारांनी “आयकॉनिक ब्लॅक लेडी” जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होताना पाहिले.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टने वर्चस्व गाजवले. आलियाने फिल्म फेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब जिंकला. त्याचप्रमाणे तिचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. गंगूबाई काठियावाडी या सिनेमाला 10 पुरस्कार मिळण्यासोबत संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे सर्व स्तरांतून तिचे कौतुक करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

त्याचप्रमाणे ‘फिल्मफेअर 2023’मध्ये ‘बधाई दो’ ते ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमांनी बाजी मारली आहे. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी…

‘फिल्मफेअर पुरस्कार 2023’च्या विजेत्यांची संपूर्ण यादी… (Filmfare Awards 2023 Winners List)
सर्वोत्कृष्ट चित्रपट : गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी) (Sanjay Leela Bhansali)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : राजकुमार राव (बधाई दो) (Rajkummar Rao – Badhaai Do)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) (Alia Bhatt – Gangubai Kathiawadi)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अनिल कपूर (जुग जुग जियो) (Anil Kapoor – JugJuggJeeyo)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चड्ढा (बधाई दो) (Sheeba Chaddha – Badhaai Do)
सर्वोत्कृष्ट संवाद : प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी) (Prakash Kapadia, Utkarshini Vashishtha)
सर्वोत्कृष्ट पटकथा : अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट कथा : अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो)
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 – प्रेम चोप्रा (Prem Chopra)

हे सुद्धा वाचा:

अवॉर्ड फंक्शनमधून ‘रेड कार्पेट’ गायब! ऑस्करची 62 वर्षांची परंपरा बदलणार

किम कार्दशियन सारखी दिसणाऱ्या क्रिस्टीना एश्टनचा मृत्यू; जगभरातील चाहत्यांना धक्का

कोट्यवधींची गाडी सोडून साराने केला सर्वसामान्यांसारखा मेट्रोचा प्रवास; पाहा व्हिडिओ

Filmfare Awards 2023, Alia bhatt, Gangubai Kathiawadi, 10 Filmfare awards for Gangubai Kathiawadi, Filmfare Awards 2023: Alia Dominates Filmfare; As many as 10 awards for Gangubai Kathiawadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी