29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रबारसू रिफायनरी प्रकल्प: कोकणात जनआंदोलन पेटणार! वाचा नेमकं प्रकरण

बारसू रिफायनरी प्रकल्प: कोकणात जनआंदोलन पेटणार! वाचा नेमकं प्रकरण

कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या रान पेटले आहे. ग्रामस्थांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवत आंदोलनाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे ‘बारसू’कडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषत: प्रस्तावित रिफायनरी जागेच्या सर्व्हेला ग्रामस्थांचा विरोध केला आहे. रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेने संघर्ष वाढलेला आहे. दरम्यान या रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी शासनाचा स्थानिकांवर बारसूमध्ये एक प्रकारचा अघोषित कर्फ्यू लावला आहे.

पंचक्रोशीत पोलिसांनी अघोषित कर्फ्यू लागू केला असून सशस्त्र पोलीस चोवीस तास पहारा देत आहेत आणि पोलीस व्हॅन स्थानिक लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस फेऱ्या मारत आहेत. गावकऱ्यांसाठी पाणी घेऊन जाणारे टँकरही पोलिसांकडून रोखले जात असून, ग्रामस्थांना त्यांच्याच शेतात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बारसूपर्यंत कोणीही पोहोचू नये म्हणून धरतळे आणि रंताळे येथे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. प्रकल्पस्थळाची खरी स्थिती उघड करणाऱ्या पत्रकार आणि प्रसारमाध्यमांना वृत्तांकन आणि व्हिडिओ शूट करण्यासही बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती उघडकिस आली आहे.

प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू झालेले आंदोलन काल सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. विशेष म्हणजे, कडक उन्हातही आंदोलकांनी रात्रीही प्रकल्पस्थळी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले होते. जोपर्यंत प्रकल्प रद्द करण्याची घोषणा होत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. गाडी चालवा, गोळ्या घाला पण आंदोलन मागे घेणार नाही, अशी शपथ आंदोलकांनी घेतली आहे. या आंदोलनाला बारसू, सोलगाव पंचक्रोशी, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय न घेतल्यास संपूर्ण कोकणात जनतेच्या पाठिंब्याने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही रिफायनरी विरोधी संघटनेने दिला आहे.

हे सुद्धा वाचा : 

बारसू रिफायनरी प्रकरण: आम्ही शेतकरी आहोत दहशतवादी नाही; शेकडो ग्रामस्थांचा आक्रोश

बारसू रिफायनरी प्रकल्प: ठाकरेंनी त्यावेळेस का विरोध केला नाही? मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

बारसू प्रकल्पाबाबत चर्चेतून मार्ग काढा; शरद पवारांचा उदय सामंतांना सल्ला

नेमकं प्रकरण
कोकणात राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या रद्द झालेल्या अधिसूचनेनंतर आता बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग कंपनी प्रस्तावित आहे. थोडक्यात तेल शुद्धीकरण करणारा हा मोठा प्रकल्प आहे. दरम्यान या परिसरातील ग्रामस्थांनी या प्रकल्पासाठी कडाडून विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेती, आंबा, मच्छी व्यवसाय हे सगळेच या नष्ट होईल. हा प्रकल्प प्रदूषण करणारा आहे. त्यामुळे कोकणातील निसर्गाला, जैवविविधतेला, पर्यावरणाला या प्रकल्पाने बाधा पोहोचेल. त्यामुळे आमचा पारंपरिक शेती व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, आंबा काजूच्या बागा नष्ट होतील, अशी भीती व्यक्त करत येथील ग्रामस्थांनी नियोजित प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे.

Barsu Refinery Project, Mass Movement to Ignite in Konkan, Barsu Refinery Project: Mass Movement to Ignite in Konkan? Read the actual case

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी