30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनश्रमेश बेटकरच्या रक्तरंजित पत्रावर हेमांगी कवी काय म्हणाली?

श्रमेश बेटकरच्या रक्तरंजित पत्रावर हेमांगी कवी काय म्हणाली?

तुम्ही हेमांगी कवी आणि श्रमेश बेटकर यांना ओळखता काय? यावर तुम्ही लगेच म्हणाल, ‘वो राव आम्हाला येड्यात काढता की काय? आख्खी (मराठी) दुनिया ओळखते की वो त्यांना’. असो, तुम्ही त्यांना ओळखता ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. आता हे तुम्हाला का विचारलं, याचंही उत्तर देतो. त्यासाठी या दोघांचा व्हिडीओ तुम्हाला पाहावा लागेल. झालं असं की शादीशुदा श्रमेश बेटकरनं कुणा एकीला म्हणे पत्र लिहिलं. ते पत्र साधंसुधं नव्हतं तर रक्तरंजित होतं. अहो असं बुचकाळ्यात का पडलात? श्रमेश बेटकरनं ते लिहिलं तर तुम्हाला एवढं ऑकवर्ड वाटण्याचं कारण काय?

आता हे श्रमेश बेटकरपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. कारण या श्रमेशच्या पत्राची बातमी हेमांगी कवीपर्यंत पोहोचली आणि तिने श्रमेशचा चांगलाच समाचार घेतला. हेमांगीनं काम करताना किचनमधूनच श्रमेशला थेट सुनावलं, अरे वेड्या कुठल्या जमान्यात वावरतोस? शिवाय रक्तरंजित पत्रावरूनही तिनं श्रमेशला चांगलंच खडसावलं आहे. श्रमेश बेटकरची तक्रार ही होती की, पोस्टमनला त्या कुणा एकीचं गावं सापडलं नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगी कवी ही जबरदस्त ऊर्जा असलेली अभिनेत्री आहे. अलीकडेच तिनं ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. थेट अचूक आणि बिनधास्त वाणीसाठी हेमांगी कवी ओळखली जाते. तर श्रमेश बेटकर लेखक आणि अभिनेता आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून श्रमेशनं केलेल्या दर्जेदार ‘फालतुगिरी’मुळे हास्यजत्रेच्या लोकप्रियतेला चार चांद लागले आहेत.

हे ही वाचा

दिशा पटाणीला नक्की काय सांगायचं आहे?

हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून ‘आउट’, ‘हा’ खेळाडू ‘इन’

शिवराय, आंबेडकरांबद्दल नागराज मंजुळेंचं मोठं वक्तव्य

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी