28 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनदिशा पटाणीला नक्की काय सांगायचं आहे?

दिशा पटाणीला नक्की काय सांगायचं आहे?

दिशा पटाणी कायम चर्चेत असते. वाईट अर्थाने नाही तरीही तिच्या व्हिडीओंमुळे ती कायम गॉसिपमध्ये असते. किंबहुना तेच तिला जास्त आवडतं, असं दिसतं. म्हणून दिशाचा पटाणीचा हा नवा व्हिडीओ जरा जास्तच ‘गरम’ आहे. ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटानंतर दिशा पटाणी एकदम प्रकाशझोतात आली. बॉलिवूडमध्ये दिशाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. चित्रपट किती चालले हा भाग वेगळा पण दिशाच्या चर्चेला कधी पूर्णविराम लागला नाही. आताही एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या व्हिडीओमुळे तिच्या चाहत्यांचा काळीज धड धड होऊ लागलं आहे.

चित्रपट करतानाच मॉडेलिंगविश्वास लीलया वावरणारी दिशा पटाणी कायम फिटनेसवर भर देते. आणि करिअरसाठी त्याची गरज देखील असते, हे दिशा पटाणीकडे पाहिल्यावर पटतं. या व्हिडीओतून तुम्हाला कळेल, फिटनेसमुळे दिशा पटाणीचा लूक कसा दिसतो.

तेलुगू चित्रपटातून हिंदी फिल्म इंडस्ट्रीकडे वळलेली दिशा पटाणीची सुरुवात मॉडेलिंगमधून झाली. त्यानंतर तिला पहिला ब्रेक ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून मिळाला. त्यानंतर ती जी काही यशाच्या शिखरावर गेली ती आजतागायत तिथेच आहे. शिवाय ती बिनधास्त गर्ल देखील आहे. सोशल मीडियावरील तिचा हा लेटेस्ट व्हिडीओ पाहिल्यावर दिशा किती बिनधास्त आणि बेधडक आहे, हे तुम्हाला समजेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी