31 C
Mumbai
Monday, September 4, 2023
घरमनोरंजनकार्तिक अन् साराचे पुन्हा सुर जुळले...

कार्तिक अन् साराचे पुन्हा सुर जुळले…

‘लव आज कल 2’ चित्रपटातील अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान ब्रेकअपनंतर तब्बल तीन वर्षांनी प्रसारमाध्यमांसमोर एकत्र आले. अभिनेता सनी देओल यांनी गदर 2 च्या सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली. पार्टीत कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकमेकांसमोर येताच त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. एक्स गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं अलिंगन कॅमेऱ्यात सहज कैद झालं. दोघांनीही एकमेकांत बाबतच्या नातेसंबंधाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं.

सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आणि सारा सध्या आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये नाहीयेत. बॉलीवूडचे बरेचसे कलाकार शनिवारी सनी देओलच्या पार्टीत होते. कार्तिक आर्यन, सारा अली खान या तरुण कलाकारांची मंडळी एका ग्रुपमध्ये होती. एकमेकांसमोर आल्यानं त्यांनी जुने मतभेद विसरून मित्रत्वाच्या नात्याने एकमेकांशी गळाभेट घेतली. पार्टीतून निघताना सारा अली खान, कार्तिक आर्यन, क्रिती सेनोन आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा एकत्र होते. एकमेकांशी हसत गप्पा मारत पार्टीतून जाताना सारा आणि कार्तिक आर्यनने फोटोग्राफरला गुडबायदेखील केलं. हा सर्व प्रकार पाहताच दोघांच्याही रिलेशनशिप स्टेटसबद्दल उधाण आलं.

हे ही वाचा 

पाकिस्तानी तरुणी म्हणाली ‘त्याच्या’ ऐवजी विराट कोहलीची निवड करेन

बूमराह झाला ‘बाप’! इन्स्टावरुन दिली ही मोठी बातमी..

‘या’कारणासाठी नयनतारा म्हणाली थँक्स कतरिना !

2020 साली प्रदर्शित झालेल्या ‘लव आज कल 2’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचं एकमेकांशी प्रेम जुळलं. ‘लव आज कल 2’ शूटिंगपूर्वीच सारानं मला कार्तिक आर्यन सोबत डेटवर जायची इच्छा व्यक्त केली होती. कार्तिकीही बरेचदा पत्रकारांनी साराचा विशेष छेडताच लाजायचा. साराशी ब्रेकअपनंतर कार्तिकने काही काळ रितिक रोशन च्या पुतणीला डेट केलं. सारा सध्या संपूर्णपणे करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. पुन्हा नव्या चित्रपटात पाहायला आवडेल अशी इच्छा नेटीझन्सनं व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी