29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईमट्रेनी एअर होस्टेसची गळा चिरून हत्या; आरोपीने सफाईच्या बहाण्याने केला फ्लॅटमध्ये प्रवेश

ट्रेनी एअर होस्टेसची गळा चिरून हत्या; आरोपीने सफाईच्या बहाण्याने केला फ्लॅटमध्ये प्रवेश

मुंबईतील अंधेरी भागात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या शिकाऊ फ्लाईट अटेंडंटची फ्लॅटमध्ये गळा चिरुन हत्या केली आहे. सोमवारी पहाटे अंधेरी येथील फ्लॅटमधध्ये तीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला, अपल ओग्रे (वय 24) असे मृत तरुणीचे नाव आहे, ती एअर इंडियात ट्रेनी फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करत होती. अंधेरीतील मरोळ येथील पॉवर सेंटर बस स्थानकाजवळ, एनजी कॉम्प्लेक्स, कृष्णलाल मारवाह मार्गावरील फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी 4 तपासी पथके तयार केली. त्यानंतर पोलिसांनी 40 वर्षीय विक्रम अटवाल याला अटक केली असून तो रुपल राहत असलेल्या सोसायटीमध्येच काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विक्रम याने रविवारी दुपारी साफसफाईच्या बहाण्याने रुपलच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर धारधार शस्त्राने रुपलचा गळा चिरला. मृत रुपलच्या गळ्यावर शस्त्राने केलेल्या हल्ल्याच्या खोल जखमा आढळून आल्या आहेत. दरम्यान आरोपी विक्रम याने गुन्ह्याची कबूली दिली असून त्याने गुन्ह्यासाठी वापरलेले शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन रुपलचा मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

मृत रुपल ओग्रे ही मुळची छत्तीसगढची रहिवासी असून एप्रिल महिन्यात ती एअर इंडियामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईत आली होती.

रुपल ओग्रे असे पीडित महिलेचे नाव असून ती मूळची छत्तीसगडची आहे. एअर इंडियामध्ये प्रशिक्षणासाठी ती एप्रिलमध्ये मुंबईत आली होती. रुपल ज्या फ्लॅटमध्ये राहत होती, त्याच फ्लॅटमध्ये तिची बहिण आणि बहिणीचा प्रियकर देखील राहत होते. ते दोघेजण काही कामानिमित्त आठ दिवसांपूर्वी आपल्या गावी गेले होते. त्याच दरम्यान आरोपीने रुपलची हत्या केली. दरम्यान या प्रकणी आज (दि.4) रोजी या घटनेची माहिती पोलिसांनी त्यांना दिल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले आहेत.

हे सुद्धा वाचा 
कार्तिक अन् साराचे पुन्हा सुर जुळले…
मराठा आरक्षण: आता मराठा -ओबीसी वाद पेटण्याची चिन्ह
पाकिस्तानी तरुणी म्हणाली ‘त्याच्या’ ऐवजी विराट कोहलीची निवड करेन

रविवारी सकाळी रुपल आपल्या कुटुंबियांशी व्हॉट्स अप व्हिडीओ कॉलवरुन कुटुंबियांसोबत बोलली. त्यानंतर दुपारी किंवा सोमवारी पहाटे आरोपीने रुपलची हत्या केली असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान जेव्हा मृत तरुणीच्या कुटुंबियांचे स्थानिक मित्र तिच्या घरी गेले तेव्हा त्यांनी तिला फोन केला मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच फ्लॅटचा दरवाजा देखील आतून लॉक असल्याचे आढळून आले. दरवाजाची बेल वाजविली असता त्याला देखील आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर जेव्हा त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बनावट चावीने फ्लॅटचा दरवाजा उघडला असता आतमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत रुपलचा मृतदेह आढळून आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी