31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजनआर्यन खानला एनसीबीने सुपर डुपर स्टार बनवलं, राम गोपाल वर्मा यांचे ट्वीट...

आर्यन खानला एनसीबीने सुपर डुपर स्टार बनवलं, राम गोपाल वर्मा यांचे ट्वीट चर्चेत

टीम लय भारी

मुंबई: दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. ट्विटरवरून ते वेगवेगळ्या मुद्दयांवर मत व्यक्त करत असतात. नुकतच राम गोपाल वर्मा यांनी आर्यनविरोधातील ड्रग्स प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. मात्र या ट्वीटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आर्यन खानवर लावण्यात आलेल्या आरोपांमधून काहीही निष्पन्न होणार नाही असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटलं आहे (Ram Gopal Varma’s indirect criticism on NCB).

एनसीबीने गेल्या आठवड्यात मुंबईतील क्रूझवर सुरु असलेल्या पार्टीवर छापे टाकले होते. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि काही जणांना अटक करण्यात आली. यावर आता फिल्ममेकर राम गोपाल वर्मांनी ट्वीट करत एनसीबीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. यात ते म्हणाले, “शाहरुख खानच्या हुशार आणि खऱ्या चाहत्यांनी खरं तर एनसीबीचे आभार मानले पाहिजेत. कारण त्यांनी सुपरस्टारच्या मुलाला सुपर डुपर स्टार बनवलं आहे. शाहरुखचा एक सच्चा चाहता म्हणून मला फक्त जय एनसीबी असा नारा द्यावा वाटतोय.” असं राम गोपाल वर्मा त्यांच्या ट्वीट मध्ये म्हणाले आहेत. यात त्यांनी एनसीबीने आर्यन खानला सुपरस्टार बनवल्याचं म्हणत चिमटे काढले आहेत.

मुस्लीम असल्यानेच आर्यन खानला दिला जातोय त्रास : मेहबुबा मुफ्ती

आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण बनावट, नवाब मलिक यांनी एनसीबीचे पितळ उघडे पाडले

एनसीबीनेच शाहरुख खानच्या आधी त्याच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला लॉन्च केलं असं राम गोपाल वर्मा त्यांच्या एका ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. आर्यन खानवर जर सिनेमा निघाला तर त्याचं नाव ‘रॉकेट’ असेल आणि हिरो म्हणून आर्यन खान त्यात मुख्य भूमिकेत झळकेल असं ते म्हणाले आहेत. शिवाय या सिनेमाची निर्मिती एनसीबी करेल आणि काही राजकीय नेते सह-निर्माते असतील असं म्हणत त्यांनी एनसीबीसह राजकिय नेते आणि मीडियावर निशाणा साधला आहे.

आर्यन खानसह आठ जणांच्या जामीनावर आज फैसला!

Ram Gopal Varma writes in support of Aryan Khan, says ‘NCB has made Shah Rukh Khan’s son a super-duper star. I just want to shout Jai NCB’

तर आणखी एका ट्वीटमध्ये ते म्हणाले, “स्वतःच्या वडिलांपेक्षा तुरुंगात आणि एनसीबी कडून आयुष्याबद्दल जास्त शिकायला मिळालं हे आर्यन खान भविष्यात म्हणेल अशी मी पैज लावतो.” असं राम गोपाल वर्मा म्हणाले. तर आणखी एका ट्वीटमध्ये ते म्हणाले, “स्वतःच्या वडिलांपेक्षा तुरुंगात आणि एनसीबी कडून आयुष्याबद्दल जास्त शिकायला मिळालं हे आर्यन खान भविष्यात म्हणेल अशी मी पैज लावतो.” असं राम गोपाल वर्मा म्हणाले.

तसचं एका ट्वीटमध्ये आर्यन खानवरील आरोपांमधून काहीही निष्पन्न होणार नाही असं ते म्हणाले आहेत. “एजन्सीसह प्रत्येकाला माहित आहे की आर्यन खानवर लावलेल्या आरोपांमधून काहीही निष्पन्न होणार नाही. निकालात विलंब करण्यासाठी सर्व युक्त्या वापरून झाल्यानंतर तो नक्कीच बाहेर येईल.” असं ही ते म्हणाले आहेत.

Maratha Reservation

आर्यन खानला जेलमध्ये वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत असेल अशी अनेकांकडून वक्तव्य केली जात आहेत. यावर देखील राम गोपाल वर्मांनी मत मांडलं. शाहरुख खानला सुपरस्टार होण्यासाठी ज्या संघर्षाचा आणि परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. जेल मध्ये आर्यनला नक्कीच तेवढ्या वाईट परिस्थितीचा सामना कराना लागत नसेल असं ते म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी