27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी आढळला मृतदेह

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी आढळला मृतदेह

मराठी चित्रपटसृष्टीतीले प्रसिद्ध मराठी अभिनेते- दिग्दर्शक रवींद्र महाजनी यांचा राहत्या घरी मृतदेह आढळला आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शुक्रवारी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील आंबी गावातील घरात त्यांचा मृतदेह सापडला आहे. अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास पोलिसांशी संपर्क साधला. काही वेळातच तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले असता अपार्टमेंट आतून कुलूप असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. महाजनांचा मृत्यू दोन दिवसाआधीच झाल्याचं सांगण्यात आले.

गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून ते एकटेच पुण्यात राहत होते. त्यांचा मुलगा अभिनेता हा गश्मीर महाजनी, बायको आणि आई हे मंबईत राहतात. तात्काळ पोलीसांनी महाजनी कुंटूबीयांना माहिती देण्यात आली. त्यानंतर गश्मीर यांनी तात्काळ पुण्यामध्ये धाव घेत वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोस्टमार्टम केल्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येईल. सध्या तरी अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. त्याचवेळी आता रवींद्र यांच्या निधनाच्या दु:खद बातमीने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सामान्य नागरिक आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे.

हे सुध्दा वाचा:

भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू यांना मंत्रीपदाची हुलकावणी

अजित पवार यांची फाइल दोन चाळणीतून जाणार; निधी वाटपात समानतेसाठी हे नियोजन

हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल; चांद्रयान- ३ च्या यशस्वी उड्डानानंतर मोदींच्या शुभेच्छा

अभिनयाची आवड म्हणून त्यांनी नाटकातून सुरुवात केली. रवींद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यांनी हिंदी आणि गुजराती चित्रपटामध्ये काम केले होते. 1975 मध्ये आयव्ही शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी इंडस्ट्रीत पदार्पण केले. मुंबईचा फौजदार, कळत नकळत, लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. रवींद्र महाजनी यांनी अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक-निर्माता म्हणूनही काम केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी