29 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमनोरंजनचित्रपट फ्लॉप ठरत असल्याने सलमान खानने घेतला 'हा' निर्णय

चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने सलमान खानने घेतला ‘हा’ निर्णय

अभिनेता सलमान खान सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे वैतागलेल्या सलमानचे करियर सावरण्यासाठी जुना मित्र आणि दिग्दर्शक करण जोहर धावून आला आहे. करण जोहर आणि सलमान खान २५ वर्षानंतर एकत्र सिनेमा करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. दोघांनी २५ वर्षांपूर्वी ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाचा मुख्य नायक शाहरुख खान असूनही, सलमानने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. चित्रपट हिट झाल्यानंतर सलमान आणि करणने पुन्हा एकत्र काम केले नाही. नव्या चित्रपटात सलमान मुख्य भूमिकेत असेल, अशी जोरदार चर्चा आहे.

सलमानचा ‘राधे’, ‘किसी का भाई किसी की जान’ हे दोन्ही चित्रपट सुपर फ्लॉप ठरले. सलमान आपल्या मुलीच्या वयाच्या हिरोईन सोबत काम करत असल्यामुळे टीकेचा सामना करतोय. वयस्कर सलमान आणि पंचविशीतली हीरोइन या चुकीच्या समीकरणाचा थेट परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर दिसून येत आहे. ‘दबंग’ सिरिजचे चित्रपट, टीव्हीवरील बिग बॉस रिॲलिटी शो वगळता सलमानकडे सलमानकडे चांगले प्रोजेक्ट नाही. अशातच बॉटॉक्स उपचार घेत तरुण दिसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सलमान सोशल मीडियावर चांगलाच ट्रॉल होतोय.


मध्यंतरीच्या काळात सलमान आणि संजय लीला भन्साळी ‘इन्शाअल्लाह’ चित्रपटात काम करणार होते. चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी करणार होते. सध्याची आघाडीची अभिनेत्री आलिया भट चित्रपटाची मुख्य नायिका होती. आलियासोबत चुंबन दृश्यामुळे सलमान चित्रपट नाकारला. सलमानने माघार घेतल्याने संजय लीला भन्साळी यांनी चित्रपट निर्मितीचा निर्णय मागे घेतला.

संजय लीला भन्साळी यांनी आलियाला घेऊन ‘गंगुबाई काठीयावाडी’ चित्रपटाची निर्मिती केली. ‘गंगुबाई काठीयावाडी’ चित्रपटामुळे आलियाचे करिअर बहरले. दुसरीकडे सलमानची फ्लॉप चित्रपटांची मालिका सुरू झाली. अशातच सलमान आणि करण जोहर एकत्र येत असल्याच्या चर्चेने पुन्हा सलमानचे करियर रुळावर येणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

हे ही वाचा 

२५ वर्षांनंतर काजोल पुन्हा बनली ‘अंजली’!

राष्ट्रीय पुरस्कार पटकावताना लग्नातली साडी नेसली… काय म्हणाली आलिया भट्ट

लग्नानंतर पहिल्यांदाच लॅक्मे फॅशन वीकमध्ये परिणीती साडीत अवतरली!

या चर्चेबद्दल दिग्दर्शक करण जोहरने पत्रकारांना ठोस उत्तर दिले नाही. करण म्हणाला, “मला सलमान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल खूप आदर आहे. माझे वडील आणि सलमानचे वडील सलीम खान खूप चांगले मित्र होते. हे मैत्री आमच्यातही घट्ट टिकून आहे.” एवढेच बोलून करणने पत्रकारांच्या प्रश्नोत्तरातून काढता पाय घेतला. सलमान खान याबाबतच्या प्रतिक्रियासाठी उपलब्ध झाला नाही. सध्या सलमान खान ‘बिग बॉस’ या प्रसिद्ध रियालिटी शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सलमानच्या टीमनेही याबाबत माहिती देण्यास नकार दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी