24 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमनोरंजनलग्नानंतर पहिल्यांदाच लॅक्मे फॅशन वीकमध्ये परिणीती साडीत अवतरली!

लग्नानंतर पहिल्यांदाच लॅक्मे फॅशन वीकमध्ये परिणीती साडीत अवतरली!

लग्नानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री परिणीती चोप्रा लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. लग्नानंतर पहिल्यांदाच परिणीती सार्वजनिक कार्यक्रमात दिसली. पांढऱ्या रंगाची साडी, गुलाबी रंगाचा चुडा आणि डोक्यावर कुंकू या वेषात परिणीतीला पाहून सर्वजण थक्क झाले. शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात अभिनेत्री तारा सुतारिया, रकुल प्रीत आणि दिशा पटानीदेखील रॅम्प वॉकसाठी उपस्थित होत्या. मात्र सर्वांच्या नजरा नववधू परिणीती चोप्रावर खिळून राहिल्या. भारतीय वेषात परिणीती विनम्रतेने नमस्कार करत रॅम्प वॉक करत असताना पाहून सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

राजस्थान येथील उदयपूर शहरात २३ सप्टेंबर रोजी अभिनेत्री परिणीती चोप्राने आम आदमी पक्षाचे नेता राघव चड्ढा यांच्याशी लग्न केले. या खासगी विवाह सोहळ्यात बॉलिवूडमधून फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन उपस्थित होते. परिणीतीची जवळची मैत्रीण सानिया मिर्झाही लग्नाला आवर्जून उपस्थित होती. याव्यतिरिक्त परिणीतीने कोणालाही आमंत्रित केले नाही. परिणीतीने बऱ्याच बॉलिवूडच्या सहकलाकारांना लग्नसोहळ्याला आमंत्रित केले नाही. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच परिणीती पती राघव चड्ढासह दिल्लीत सासरी परतली.


परिणीतीचा अभिनेता अक्षय कुमारसोबत नुकताच ‘मिशन राणीगंज-भारतातील सर्वात मोठे बचाव कार्य’ चित्रपट प्रदर्शित झाला. परिणीती चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित नव्हती. दिल्लीत दोन आठवड्यांच्या मुक्कामानंतर परिणीती नुकतीच मुंबईत परतली. विमानतळावर जीन्स टॉपसह हातात चुडा आणि डोक्यात कुंकू लावलेल्या परिणीतीची सर्वांनी प्रशंसा केली.

मुंबईत परतताच परिणीती शनिवारी लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. रकुल प्रीत, तारा सुतारिया आणि दिशा पटानी ब्लाउज आणि लेहंगामध्ये वावरत होते. परिणीतीने साडी परिधान केली होती. मोकळे केस आणि कुंदन दागिन्यात नटलेली परिणीती फारच छान दिसत होती. परिणीती आता बॉलिवूडच्या कलाकारांना लग्नाची पार्टी देते का, यावरही सर्वांची कुजबुज सुरु होती.

हे ही वाचा 

आली रे आली ‘सिंघम अगेन’ची हिरोइन आली!

अन् भर कार्यक्रमात निकने प्रियंकासमोरच ‘हिला’ केले किस

माहिरा खानच्या अदांनी सगळेच घायाळ

गेल्या वर्षी पंजाबमध्ये परिणीती चोप्राच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिचे आणि राघव चड्ढाचे एकमेकांवर प्रेम जडले. दोघेही एकमेकांना आपापली व्यावसायिक कारकीर्द सुरु होण्याअगोदरपासून ओळखतात. लंडनमध्ये शिक्षणादरम्यान दोघांची ओळख झाली. भारतात परतल्यानंतर दोघेही फारसे एकमेकांच्या संपर्कात नव्हते. गेल्यावर्षी पंजाबमध्ये दौऱ्यावर असलेल्या राघवला परिणीतीचे जवळच शूटिंग सुरु असल्याचे समजले. दोघांनीही एकत्र सकाळची न्याहारी केली. आपण एकमेकांसाठी जीवनसाथी म्हणून योग्य असल्याचे दोघांनाही जाणवले.

व्यावसायिक पातळीवर राघव सध्या केंद्र सरकारच्याविरोधात आंदोलनाच्या भूमिकेत आहे. आम आदमी पक्षाच्यावतीने राष्ट्रीय सर्व राजकीय पक्षांच्या बैठकांमध्ये राघव जातीने हजर असतो तर परिणीतीकडे फारसे काही खास प्रोजेक्ट नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी