27 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमनोरंजनराष्ट्रीय पुरस्कार पटकावताना लग्नातली साडी नेसली... काय म्हणाली आलिया भट्ट

राष्ट्रीय पुरस्कार पटकावताना लग्नातली साडी नेसली… काय म्हणाली आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्टला मंगळवारी ‘गंगूबाई काठीयावाडी’ चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दिल्लीत पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला आलियाने पती रणबीर कपूरसह हजेरी लावली. आलियाने लग्नातील साडी पुरस्कार सोहळ्यासाठी परिधान केली होती. अभिनेत्री एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरत नाही. मात्र आलियाने हा समज मोडीत काढल्याने सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

आलिया भट्टने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अभिनेता रणबीर कपूरशी लग्न केले होते. एकमेकांना पाच वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी अचानक राहत्या घरी लग्न केले. लग्नानंतर वर्षाअखेरिस नोव्हेंबर महिन्यात आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीरने मिळून मुलीचे नाव ‘राहा’ ठेवले. राहाच्या जन्माच्या पाच महिन्यातच आलिया कामावर रुजू झाली. अभिनेता रणबीर कपूरसोबत तिचा ‘रॉकी और रानी’ चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. ऑगस्ट महिन्यात आलिया भट्टचा २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठीयावाडी’ चित्रपटाला राष्ट्रीय नामांकन मिळाले असून, तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)


आलिया भट्टसह अभिनेत्री क्रिती सॅननला ‘मिमी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मूळ दिल्लीची रहिवासी असलेल्या क्रितीला आपल्या दिल्लीतच राष्ट्रीय पुरस्कार मिळत असल्याने भलताच आनंद झाला. या पुरस्कार सोहळ्याला तिचे आई-वडील उपस्थित होते. क्रितीने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली साडी परिधान केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)


आलियाने नव्या कोऱ्या कपड्याऐवजी लग्नाची साडी पुन्हा परिधान करणे पसंत केले. चांगल्या सोहळ्यात उपस्थित राहताना आठवणीतील चांगले कपडे घालायला काय हरकत आहे. कपडे पुन्हा वापरा असा सल्ला आलियाने दिला. हा दिवस माझ्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस असल्याचेही आलियाने सांगितले.

हे ही वाचा 

२५ वर्षांनंतर काजोल पुन्हा बनली ‘अंजली’!

लग्नानंतर पहिल्यांदाच लॅक्मे फॅशन वीकमध्ये परिणीती साडीत अवतरली!

आली रे आली ‘सिंघम अगेन’ची हिरोइन आली!

आलियाची मुलगी राहा येत्या ६ नोव्हेंबर रोजी एका वर्षाची होईल. मात्र आलियाने मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीच्या नियोजनाची माहिती देणे टाळले. आलियाचा नवरा अभिनेता रणबीर कपूरला खासगी आयुष्याबद्दल माहिती देणे आवडत नाही. आलियाही आपले खासगी आयुष्य जपते. दोघांनीही राहाच्या चेहऱ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. फोटोग्राफर्सनेही मुलीचे सार्वजनिक ठिकाणी फोटो काढू नयेत, अशी विनंती केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी