33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजशेतकऱ्याला दोन एकर गांजा पिकवायचा आहे, सरकारकडे मागितली परवानगी

शेतकऱ्याला दोन एकर गांजा पिकवायचा आहे, सरकारकडे मागितली परवानगी

टीम लय भारी
सोलापूर : शेतात कोणतेही पीक पिकवा, पण ते हमखास तोट्यातच जाणार. काबाडकष्ट करूनही शेतकऱ्याला पुरेसा दर मिळत नाही. त्यामुळे संतापलेल्या एका शेतकऱ्याने चक्क गांजाची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी परवानगी मागणारे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना लिहिले आहे(farmer has demanded the government to cultivate cannabis).

पत्राला उत्तर मिळाले नाही तर दोन एकर गांजा करणार आहे, असेही या शेतकऱ्याने शंभरकर यांना ठणकावले आहे. अनिल पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मोहोळ तालुक्यातील शिरपूर या गावचे ते रहिवाशी आहेत.

राणे कुटुंबियांची कोंबडीची दोन दुकाने, पत्नीच्या नावाने बार

तालिबानने अक्कल पाजळली, भारताला दिला फुकटचा सल्ला

farmer
शेतकऱ्याला दोन एकर गांजा पिकवायचा आहे

भारतात गांजा, अफूची शेती पिकविण्यास बंदी आहे. गांजा, अफू पिकविणाऱ्या अथवा जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीवर ‘अंमलीपदार्थ विरोधी कायद्या’नुसार कारवाई केली जाते. सध्या चर्चेत असलेला अफगाणिस्तान हा देश अतिरेकी कारवायांसाठी जसा प्रसिद्ध आहे, तसाच तो अफूच्या शेतीसाठीही प्रसिद्ध आहे.

अनिल पाटील यांना गांजाची शेती पिकविणे शक्य होणार नाही. परंतु त्यांच्या पत्रामुळे शेतकऱ्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले गेले आहे.

शाळकरी मुलांना मिळणार शेतीचे शिक्षण

शेतकऱ्याला दोन एकर गांजा पिकवायचा आहे, सरकारकडे मागितली परवानगी

Farmers have right to protest but stir should not hinder traffic: SC

ऊस हे पैसे मिळवून देणारे पीक आहे. परंतु साखर कारखान्याला ऊस दिला तरी त्याचे बिल वेळेवर मिळत नाही, असे पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे. १५ सप्टेंबर पर्यंत लेखी परवानगी नाही मिळाल्यास गांजाचे पीक करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काही कारवाई झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी