29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeसंपादकीयआनंद दिघेंनी ठाण्यात शिवसेना वाढविली, त्यांचा वारसा एकनाथ शिंदेनी चालवला

आनंद दिघेंनी ठाण्यात शिवसेना वाढविली, त्यांचा वारसा एकनाथ शिंदेनी चालवला

रसिका जाधव : टीम लय भारी

आनंद दिघे यांच्यामुळे ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला  जातो. शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाण्याने नेहमीच शिवसेनेला साथ दिली. शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली ती ठाण्यातच. ९० च्या दशकात शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे असे जणू समीकरणच तयार झाले होते. शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना हे सूत्र पक्क करण्यासाठी अगदी तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम करणारा नेता म्हणजे आनंद दिघे अशी त्यांची ठाण्यात ओळख आहे. २६ ऑगस्ट २००१ या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली (Shiv Sena legacy of Anand Dighe was carried forward by Eknath Shinde).

आनंद दिघे यांचे संपूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे असे आहे. आनंद दिघेंचा जन्म २७ जानेवारी १९५२ ला झाला. आज आनंद दिघे यांची २० वी पुण्यातिथी आहे. आज २० वर्षानंतर देखील आनंद दिघे यांचे ठाण्यात आदराने नाव घेतले जाते. ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात त्यांचे घर होते. या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. तरुण आनंद दिघे बाळासाहेबांच्या सभांना उपस्थित राहायचे.

मंत्री एकनाथ शिंदेंचा दणका, महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई होणार

वाढदिवसानिमित्त मंत्री एकनाथ शिंदे यांचे अनोखे समाजकार्य; हृदयाला छिद्र असलेल्या १०० मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करणार

बाळासाहेबांचे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती. त्यामुळे त्यांनी उभे आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचे ठरवले आणि ७० च्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. त्यांच्या कामात इतके झपाटलेपण होते की त्यांनी लग्नसुद्धा केले नाही (He was so busy at work that he did not even get married).

शिवसेनेला ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात आनंद दिघे यांच्या रूपाने पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला होता. दिघेंच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेने त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली. दिघेंच्या घरी आई, भाऊ आणि बहीण असा परिवार होता. ठाण्यातील सर्वात गजबजाटलेला परिसर म्हणून ओळख असणाऱ्या टेंभी नाका परिसरामध्ये त्यांचे घर होते. परंतु जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आल्यावर त्यांनी घर वगैरे सगळ दूर केले. आनंद दिघे हे टेंभी नाक्यावरील कार्यालयातच राहू लागले. त्यांनी स्वत:ला शिवसेनेच्या कामात पूर्णपणे झोकून दिले. अनेकदा कार्यकर्तेच त्यांना डबा आणून द्यायचे.

Shiv Sena of Anand Dighe was carried forward Eknath Shinde
आनंद दिघेंच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेने त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली

Lockdown2 : मंत्री एकनाथ शिंदेंमुळे तामिळनाडूत अडकलेल्या 160 मराठी तरूणांना मिळाला आधार

‘No’: Eknath Shinde replies to Narayan Rane’s ‘fed up with Sena’ claim

शिवसेनेला सुरुवातीच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सामान्यांमधून पुढे आलेले आणि आपलेसे वाटणारे नेतृत्व हवे होते ती गरज आनंद दिघे यांनी पूर्ण केली. त्यांनी बाळासाहेबांपासून प्रभावित होऊन शिवसेनेसाठी काम करण्याचे ठरवले. ते सक्रिय राजकारणात सहभागी झाल्यानंतर मजल दरमजल करत ते ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख पदापर्यंत पोहचले. अल्पावधीमध्येच आजही शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात दिघे प्रचंड लोकप्रिय झाले (Dighe became very popular in Thane district which is considered as the stronghold of Shiv Sena).

आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरातच ‘आनंद आश्रमा’ची स्थापना केली. या आश्रमात दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरायचा. आपल्या तक्रारी दिघे यांना ऐकवण्यासाठी लोक सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावून उभे असायचे. ठाणे शहरच काय जिल्हाभरातील लोक येथे येऊन त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तत्काळ सोडवायचे. दिघे यांनी कधीच बघू करु अशी उत्तरे दिली नाहीत. अनेकदा ते तक्रार ऐकल्यानंतर तेथूनच फोन करायचे आणि तक्रार सोडवण्याच्या सूचना द्यायचे अशा आठवणी जुने शिवसैनिक आजही सांगतात. कधी कधी काम पूर्ण करुन घेण्यासाठी त्यांनी रोकठोक भूमिकाही घेतल्या आहेत. त्यांनी काही प्रसंगी हात उचलल्याचेही उदाहरणे आहेत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल प्रशासनापासून सामान्यांपर्यंत एक आदरयुक्त दरारा तयार झाला होता.

आनंद दिघे यांची सामान्यांमध्ये आपला नेता अशी ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच अगदी लहानसहान भांडणांपासून ते घरातील तक्रारींपर्यंत अनेक विषय दिघेंच्या जनता दरबारामध्ये यायचे. ठाण्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिघेंनी अनेक प्रयत्न केले अनेकांना स्टॉल उभारुन दिले. तर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या याच कामांमुळे आज त्यांच्या मृत्यूला २० वर्ष झाले तरी ठाणेकर दिघेंना विसरलेले नाहीत (Even though it is 20 years since his death, Thanekar has not forgotten Dighe).

Shiv Sena of Anand Dighe was carried forward Eknath Shinde
आनंद दिघे यांनी कामात स्व:तला वाहून घेतले

दिघे यांनी स्थापन केलेले ‘आनंद आश्रम’ हे समांतर न्यायालयाच्या भूमिकेत काम करत असल्याची टीका त्यावेळी ठाण्यातील समाजवादी मंडळींनी केली होती. दिघे यांना देवा-धर्माच्या कार्याची विशेष आवड होती. त्यांनीच टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव सुरु केला. सर्वात पाहिला मोठा दहिहंडी उत्सवही दिघेंनीच टेंभी नाक्यावर सुरु केला. आजही या दोन्ही उत्सवांसाठी जिल्ह्याबरोबरच राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक आवर्जून येतात. त्यांच्या याच धार्मिक कार्यामुळे त्यांना शिवसैनिकांनी ‘धर्मवीर’ ही उपाधी दिली (Due to his religious activities, Shiv Sainiks gave him the title of ‘Dharmaveer’).

आनंद दिघेंचे ठाण्यातील कार्य इतके मोठे होते की स्थानिक प्रसारमाध्यमांबरोबर इंग्रजी प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी त्यांची दखल घेतली. फ्रंटलाईन या मासिकात आनंद दिघे यांच्या संदर्भातील लेखामध्ये त्यांच्या नेतृत्वाचे वर्णन करताना ‘दिघेंनी कोणतीही निवडणूक लढवली नसली किंवा कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नसली तर ते ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ झाले होते’, असे मत मांडण्यात आले होते.

दिवसेंदिवस आनंद दिघेंचे प्रस्थ वाढत चालले होते. त्यांना वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचे त्यावेळी ऐकण्यात येत होते. कारण दिघेंमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झाला होता. पण शिवसेनेत असे चालत नाही. हे राजा आणि बाकी प्रजा, असे धोरण आहे शिवसेनेत. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते, अशी त्यावेळी ठाण्यात चर्चा होती.

Shiv Sena of Anand Dighe was carried forward Eknath Shinde
आनंदच्या हिंदुत्वनिष्ठेविषयी शंका नाही, पण आनंद ज्या पद्धतीने कारभार करत आहे त्याबद्दल प्रश्न आहे

आनंदच्या पक्षनिष्ठेविषयी प्रश्न नाही. आनंदच्या हिंदुत्वनिष्ठेविषयी शंका नाही, पण आनंद ज्या पद्धतीने कारभार करत आहे त्याबद्दल प्रश्न आहे, असे त्यावेळी बाळासाहेबांनी म्हटले होते. तर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीनुसारच काम करतो, असे दिघे यांनी म्हटले होते.

आनंद दिघे हे सण उत्सवांना त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरी आवर्जून जात होते. असेच ते २४ ऑगस्ट २००१ रोजी कार्यकर्त्यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त भेट देण्यासाठी बाहेर निघाले. याच दरम्यान ठाण्यातील वंदना टॉकीजसमोरील रस्त्यावर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले तसेच डोक्यालाही मार लागला. त्यांना तात्काळ सिंघानिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे २६ तारखेला त्यांच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली (In the evening, his health began to decline).

Shiv Sena of Anand Dighe was carried forward Eknath Shinde
आनंद दिघेंचा अपघात झाल्यानंतर मनोहर जोशी यांनी घेतली त्यांची भेट

संध्याकाळी ७.१५ वाजता त्यांना हृद्यविकाराचा पहिला झटका आला. ७.२५ मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हद्यविकाराचा झटका आला. अखेर रात्री १०.३० वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी दिघे ५० वर्षांचे होते. आनंद दिघेंचा मृत्यू झाला हे सांगण्यास कुणीच धजावत नव्हते.

शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले की, ‘आनंद दिघे आपल्यातून गेले’. उध्दव ठाकरे यांच्या घोषणेनंतर दिघेंच्या निधनाची बातमी ठाण्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर रागाच्याभरात रुग्णालयाच्या बाहेर दिघेंच्या १५०० चाहत्यांनी संपूर्ण रूग्णालयाला आग लावली. या आगीमध्ये एक रुग्णवाहिका आणि २०० बेड जळून खाक झाले. यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आणि नंतर ३४ जणांना अटक करण्यात आली.

दिघेंच्या मृत्यूनंतर ठाणे बंद ठेवण्यात आले. असे असतानाही हजारो शिवसैनिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले. दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात झालेल्या शोकसभेत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘आनंदच्या दाढीत हुकूमत होती. त्याच्या नादाला लागण्याची कोणाची हिम्मत नव्हती.’ आजही ठाण्यामधील शिवसेनेच्या प्रत्येक पोस्टरवर आनंद दिघे यांचा फोटो असतोच (Even today, every Shiv Sena poster in Thane has a photo of Anand Dighe).

“मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की…” असे म्हणत उद्धव यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शपथ घेण्यासाठी मंचावर आलेल्या एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताना आपल्या आई-वडीलांबरोबरच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचेही नाव घेतले. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन, धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचे स्मरण करुन, आई-वडीलांच्या पुण्याईने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसाहेब यांच्या आशिर्वादाने, मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की…” असे म्हणत शपथ घेतली (I swear by Eknath Sambhaji Shinde).

Shiv Sena of Anand Dighe was carried forward Eknath Shinde
आनंद दिघेंच्या पाऊलावर पाऊल ठेवत शिवसेनेचा वारसा एकनाथ शिंदेंनी पुढे चालवला

एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आणि कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा सर्वात मोठा नेता म्हणून शिंदे यांची ओळख आहे. शिंदे यांची राजकीय कारकीर्द घडण्यामध्ये आनंद दिघे यांचा मोलाचा वाटा होता. शिंदे हे दिघेंना आपला राजकीय गुरु मानतात. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्हयात शिवसेनेचे वर्चस्व कायम राखण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. नारायण राणे व राज ठाकरे पक्षातून बाहेर पडल्यावर ठाणे जिल्हयाच्या किल्ल्याला भगदाड पडू नये म्हणनू ‘मातोश्री’ने शिंदे यांना ताकद दिली. शिंदे यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेतली (Shinde worked hard for the growth of the party).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी