27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeआरोग्यवजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला नेमकं काय खावं?

वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला नेमकं काय खावं?

सकाळचा नाश्ता (Breakfast )केल्याने खरंच वजन वाढतो काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी अनेकजण नाश्ता करणं टाळतात. पण निरोगी राहाण्यासाठी सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो. तुम्ही काय खाता, किती प्रमाणात खाता, कोणत्या वेळी खाता या गोष्टी आरोग्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. ज्याप्रमाणे व्यायाम किंवा इतर गोष्टी करता त्यासोबत तुम्ही कोणता आहार घेत आहात हे देखील महत्त्वाचे असते. खरतंर सकाळचा नाश्ता(Breakfast ) हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि फायदेशीर असतो. सकाळचा अगदी भरपेट नाश्ता केला तर तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. काम करण्याची ऊर्जा मिळते. पण नेमकं काय नाश्त्याला खावं जेणकरुन वजन कमी होण्यास मदत होईल ते जाणून घेऊयात. (Breakfast Will It Help You Lose Weight)

अंड खा

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अंडे नाश्त्याला खा. अंड्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. जे तुम्हाला ऊर्जा तर देतेच पण तुमची हाडे देखील मजबूत करण्यास मदत करते. जर अंडी ऊर्जेची कमतरता असलेल्या आहाराबरोबर म्हणजे कमी उष्मांकयुक्त आहार घेतल्यास ते पौष्टिक पूरक सारखे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरु शकते.

लवकर जाग येत नाही, तर ‘या’ टिप्स करा फॉलो

केळ खा

वजन कमी करण्यासाठी तुम्ही केळाचे सेवन करु शकता. सफरचंद आणि बेरी प्रमाणेच केळी देखील वजन संतुलित करण्यास उपयुक्त ठरतात. केळी हा फायबरचा चांगला स्त्रोत आहे आणि फायबरचा अतिरिक्त आहार खाण्याच्या सवयी सुधारुन वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

ओट्स

वजन कमी करण्याकरता ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नाश्ता करायचा असेल तर दलिया हा एक चांगला पर्याय आहे.

उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला होणार ‘हे’ फायदे, जाणून घ्या

ओट्स खाल्ल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही. कारण याचे सेवन केल्याने तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची तल्लफ होणार नाही. यामुळे तुम्ही जंक फूड, तळलेले अन्न किंवा एकाच वेळी जास्त अन्न खाणे टाळू शकता.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये असलेल्या कॅटेचिनचा वजन कमी करण्यावर प्रभाव पडतो. परंतु, हा प्रभाव खूपच सौम्य आहे. दिवसभरात तीन ते चार कप ग्रीन टी प्यायल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. वजन कमी करण्यात त्याचा प्रभाव कमी असला तरी ग्रीन टी प्यायल्याने अनेक आजार टाळता येतात. पण याचे सेवन जास्त करु नका असही तज्ञ सांगतात.

हेदेखील पदार्थ नाश्त्याला खाऊ शकता

गव्हापासून बनलेली ब्रेड आणि मोड आलेले कडधान्य, प्रोटीनसाठी ब्रेड-ऑम्लेट, फळं, सुका मेवा, दही खाऊ शकता. हलकं-फुलकं खायचं असेल तर फळं, केळ, पालक, ब्रेड खाऊ शकता.

पांढरा की ब्राऊन… कुठला भात आहे आरोग्यासाठी चांगला? जाणून घ्या

पोषण घटकांचा एकत्रित समावेश असलेला प्रकार म्हणजे स्मुदीज. तसेच सकाळच्या नाश्त्याला स्मुदी प्याल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी