33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeआरोग्यफायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यांना बाधा

फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यांना बाधा

टीम लय भारी

कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ येथील अंगणवाडी मध्ये फायबर प्लॅस्टिक मिश्रित तांदूळ चिमुरड्यांनी खाल्ल्याने त्यांना बाधा झाली असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गावातील माजी सरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी याबाबत या घटनेचा पर्दाफाश केला आहे (children ate rice mixed with fiber plastic).

 संबंधित पुरवठा ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी अंगणवाडी सेविका व सर्व ग्रामस्थांनी केली आहे. या पुरवल्या गेलेल्या अन्नधान्य पुरवठा मध्ये निकृष्ट दर्जाचे फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ व डाळ मीठ मिरची पूड त्याचबरोबर इतर साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि ग्रामस्थांना दिसून आली. दोन दिवसांपूर्वीच पुरवठा झालेल्या इंदिरानगर वस्तीतील एका कुटुंबातील मुलाने तांदूळ व डाळ खाल्ल्याने त्याला बाधा झाली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार पीडित मुलगी गरोदर, प्रसूतीनंतर नवजात बालक सुरक्षित

Viral fever grips children in India: What is it and how can kids be protected | An explainer

या घटनेने संबंधित अंगणवाडी सेविका व पुरवठा प्रकल्प अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या मात्र अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना न झाल्याने हा प्रकार अंगणवाडी सेविका यांनी माजी उपसरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला.

संपूर्ण पुरवठा झालेला धान्य वस्तू तपासल्यानंतर सर्वच वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचे निदर्शनास आल्यास लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार संबंधित विभाग व ठेकेदार करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी याबाबत वरिष्ठांनी कठोर पावले उचलत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

रेशन दुकाने स्वयंसिद्ध : पासपोर्ट, पॅन, तसेच पाणी व वीज बिले भरण्यास सक्षम

children
फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चुमुरड्याना बाधा

मुख्यमंत्र्यांच्या पत्राची मंत्रालयासमोर होळी

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी