35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यCoronavirus : इस्लामपूर पुन्हा हादरले, धारावीतून आलेल्या 'त्या' महिलेला 'कोरोना'ची लागण

Coronavirus : इस्लामपूर पुन्हा हादरले, धारावीतून आलेल्या ‘त्या’ महिलेला ‘कोरोना’ची लागण

विनोद माहिते : टीम लय भारी

इस्लामपूर :  धारावीतून इस्लामपुरात आलेल्या “त्या” महिलेचा ‘कोरोना’ ( Coronavirus ) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने इस्लामपुरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी विनापरवाना धारावी येथून आलेल्या खासगी बसला सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर प्रवेश करताना कासेगाव चेक पोस्टवर रोखण्यात आले होते. यातून २१ जण प्रवास करीत होते.

Mahavikas Aghadi

या बसमधून खाली उतरून संबंधित महिला आपला मुलगा आणि दोन छोट्या नातवंडांसह छुप्या पद्धतीने इस्लामपूर शहरात दाखल झाली होती. इस्लामपूर शहरातील माकडवाले वसाहतीमध्ये धारावी ( मुंबई ) येथील नागरिक अनाधिकृतपणे आल्याबाबत नगरपालिका हेल्पलाईनवर फोन आलेला होता.

यानंतर तातडीने मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी आपल्या पथकासह आसरा देणाऱ्या त्या घराकडे धाव घेतली होती. दोघांची चौकशी करून विना परवाना इस्लामपूर शहरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याबद्दल इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यांनी दिलेल्या माहितीवरून कासेगाव येथे बस मधून सेवा रस्त्यावर उतरलेल्या उर्वरित १६ जणांना तातडीने ताब्यात घेत मिरज येथे पाठवले होते. यातील एक मुलगा बेपत्ता होता. तो आज मिरज येथे असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.

पण शुक्रवारी ‘त्या’ महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ( Coronavirus ) आल्याने खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत परिसर निर्जंतुक करण्यात येत होता.

याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी पवार म्हणाल्या की,  गुरुवारी धारावीतून इस्लामपुरात आलेल्या संबंधित महिलेला कोरोना ( Coronavirus ) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ती महिला येथे दोन तास वास्तव्यास होती. ज्या कुटुंबाने आसरा दिला त्या घरात आठ जण आहेत. त्यांना कालच होम क्वॉरंटाईन केले होते. आता आरोग्य विभागाशी चर्चा करून त्यांना संस्थात्मक क्वॉरन्टाईन केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

Jayant Patil : इस्लामपूरचे १४ रुग्ण कोरोना मुक्त, ‘सांगली’चा नवा पॅटर्न

Focus : जयंत पाटलांची अवस्था : घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी