28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeआरोग्यCoronavirusLockdown : पंतप्रधानांची मोठी घोषणा, देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन

CoronavirusLockdown : पंतप्रधानांची मोठी घोषणा, देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन

CoronavirusLockdown : ‘कोरोना’शी झुंजण्यासाठी १५ हजार कोटींची तरतूद

CoronavirusLockdown : हे २१ दिवस पाळले नाहीत, तर देश २१ वर्षे मागे जाईल

टीम लय भारी

मुंबई :  उद्धव ठाकरे सरकारने राज्यात ३१ मार्चपर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ‘लॉकडाऊन’ ( CoronavirusLockdown ) २१ दिवसांसाठी लागू करण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण देशासाठी हा ‘लॉकडाऊन’ लागू असेल. या काळात प्रत्येकाने आपल्या दारात लक्ष्मण रेषा आखून घ्या. कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नका. ‘कोरोना’ संकटापासून वाचण्यासाठी हाच एकमेव उपाय असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

‘कोरोना’च्या उपचारासाठी आरोग्य सेवा सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याची घोषणाही त्यांनी केली. देशाला उद्देशून त्यांनी आज भाषण केले.

पंतप्रधान म्हणाले की, आज रात्री बारा वाजल्यापासन देशात संपूर्ण लॉकडाऊन होत आहे. हिंदूस्थानला वाचविण्यासाठी, पूर्ण देशाला वाचविण्यासाठी, तुम्हाला – तुमच्या कुटुंबाला वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. घरातून बाहेर जाण्यासाठी आता निर्बंध लावले जात आहेत. सगळी राज्ये व केंद्रशाशित प्रदेशात आज रात्रीपासून संचारबंदी लावण्यात येत आहे. कुणालाही घराच्या बाहेर पडता येणार नाही. हे पाऊल महत्तवाचे आहे. त्याची किंमत देशाला चुकवावी लागणार आहे.

पण एकेका भारतीयाचे आयुष्य वाचविणे, तुम्हाला वाचविणे, तुमच्या कुटुंबियाला वाचविणे ही माझी, देशाची व राज्य सरकाची गरज आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्ही देशात जिथे आहात तिथेच राहा. हा लॉकडाऊन ( CoronavirusLockdown ) २१ दिवसांचा असेल. येणारे २१ दिवस प्रत्येक नागरिकांसाठी बंधनकारक आहेत.

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे की, ‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी २१ दिवस महत्वाचे आहेत. हे २१ दिवस सांभाळता आले नाही तर देश २१ वर्षे मागे जाईल. अनेक कुटुंबिय नाहीशी होतील. मी जबाबदार पंतप्रधान म्हणून तुम्हाला हे सांगत आहे. त्यामुळे बाहेर जाणे काय असते हे २१ दिवस ( CoronavirusLockdown ) विसरून जा.

एकच काम करा. घरी राहा, घरी राहा आणि घरी राहा. लॉकडाऊनने तुमच्या घराच्या दारात लक्ष्मण रेषा आखली आहे. घरातून बाहेर पडणारे तुमचे एकेक पाऊल कोरोनाला घरात घेऊन येणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे घरातच ( CoronavirusLockdown ) राहा. काहीजण सोशल मीडियावर अनोख्या पद्धतीने आवाहन करीत आहेत. त्यातील मला एक बॅनर आवडला ‘को – कोई, रो – रोडपर, ना – ना निकले’. याचे पालन करा

तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, कोरोना शरिरात शिरला की त्याचे लक्षण दिसायला अनेक दिवस लागतात. पण एवढ्या दिवसांत तो अनेकांना संक्रमित करतो. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या (हू) निकषानुसार – एक व्यक्ती शेकडो लोकांना कोरोना पसरवतो. तो आगीसारखा झपाट्याने पसरतो. ‘हू’चे आणखी एक म्हणणे आहे. ‘कोरोना’ १ लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ६७ दिवस लागले होते. त्यानंतर ११ दिवसांत नवीन एक लाख तयार झाले. २ लाखांपासून तीन लाखांपर्यंत पोचण्यासाठी अवघे ४ दिवस लागले. यावरून अंदाज लावा की, कोरोना किती वेगाने फिरतोय. हे फारच भयावह आहे.

चीन, अमेरिका, स्पेन, फ्रान्स, इटली, इराण, जर्मनी या देशांतील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. इटली असो वा अमेरिका हे देश प्रगत आहेत. या देशांची आरोग्य सेवा, रूग्णालये व आधुनिक तंत्रज्ञान जगातील सर्वोत्कृष्ट असे आहे. तरीही हे देश ‘कोरोना’चा प्रभाव कमी करू शकलेले नाहीत.

‘कोरोना’शी लढण्यासाठी एकच आशेचा किरण आहे. त्याचा अवलंब अनेक देशांनी केला. त्यातून त्यांनी ‘कोरोना’वर नियंत्रण मिळविले. या काही देशांतील लोकांनी सरकारच्या सुचनांचे पालन केले ( CoronavirusLockdown ). आठवडा – आठवडा तेथील जनता घराबाहेर निघालेली नाही. त्यांनी १०० टक्के सरकारी सुचनांचे पालन केले.

आपल्याला सुद्धा हेच करावे लागेल. हाच एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे. घरायच्या बाहेर निघायचे नाही ( CoronavirusLockdown ). काहीही झाले तरी घरातच राहायचे. सोशल डिस्टन्शिंग ठेवायचे. पंतप्रधानांपासून गावातील छोट्या नागिरकांपर्यंत सगळ्यांनी घरातील लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. आपल्याला ‘कोरोना’चे संक्रमण रोखायचे आहे. त्याची साखळी तोडायची आहे.

आपल्यावर आलेले संकट आपण किती कमी करू शकतो, यावर भर द्यावा लागणार आहे. ही वेळ पुन्हा पुन्हा संयम ठेवण्याची आहे. ‘जान है तो जहान है’. धैर्य व स्वयंशिस्तीची ही वेळ आहे. आपल्याला संकल्प करायचा आहे, व वचन पाळायचे आहे. म्हणून हात जोडून विनंती करतो घरातच राहा ( CoronavirusLockdown ).

अनेकजण जीव धोक्यात घालून काम करीत आहे. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ हे या महामारीतून एकेकाला वाचविण्यासाठी इस्पितळात काम करीत आहेत. एम्ब्युलन्स चालविणारे चालक, सफाई कामगार कठीण परिस्थितीत काम करीत आहेत. त्यांचा विचार करा. तुमचा परिसर, रस्ते विषाणूमुक्त करण्यासाठी सफाई कामगार प्रयत्न करीत आहेत. तुम्हाला २४ तास माहिती देण्यासाठी मीडियाचे लोक धोका पत्करून रस्त्यावर उतरत आहेत. त्यांचा विचार करा. पोलीस रस्त्यावर रात्रं दिवस कर्तव्यावर आहेत. लोकांची नाराजी सुद्धा ते झेलत आहेत. त्यांचाही विचार करा.

‘कोरोना’साठी केंद्र व राज्य सरकारे वेगात काम करीत आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. आवश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी सगळे उपाय केले जातील. संकटांची ही वेळ गरीबांसाठी फार मोठी मुश्कील वेळ आहे. केंद्र – राज्य सरकार, सामाजिक संस्थांसह अनेक लोक या संकटात मदतीसाठी पुढे येत आहेत. जीव वाचविण्यासाठी जे आवश्यक आहे ते करावेच लागेल.

देशाची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आम्ही निर्णय घेतले आहेत. आज १५ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ‘कोरोना’साठी चाचणी सुविधा, बेड्स, व्हेंटिलेटर्स, व्यक्तिगत सुरक्षा साधने, तसेच मेडिकल व पॅरा मेडिकल मनुष्यबळांसाठीचे प्रशिक्षण यांवर हा खर्च केला जाईल. सगळ्या राज्यांची प्राथमिकता आरोग्य सेवा हीच असेल. खासगी क्षेत्र सुद्धा या संकटाच्या काळात खांद्याला खांदा लावून मदत करेल. खासगी कंपन्यांकडून प्रयोगशाळा, इमारती वैद्यकीय कारणांसाठी दिल्या जात आहेत.

या संकटात अजानतेपणे अफवा पसरतात. माझा आग्रह आहे की, कोणत्याही अफवा आणि अंधविश्वासापासून दूर राहा. सरकारच्या सुचनांचे पालन करा. आजाराची लक्षणे आढळली तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणीही औषधे घेऊ नका. मला विश्वास आहे की, प्रत्येक भारतीय संकटाच्या या काळात सरकारी सुचनांचे पालन करेल. २१ दिवसांचा हा लॉकडाऊन ( CoronavirusLockdown ) तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आहे. या शिवाय दुसरा कोणताही महत्वपूर्ण मार्ग नव्हता. तुम्ही स्वतःची व तुमच्या आप्तांची काळजी घ्या. विजयाचा संकल्प करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

मातब्बर देशांनाही या महामारीने हतबल केले आहे. हे देश प्रयत्न करीत नाहीत असे नाही. त्यांच्याकडे यंत्रसामुग्री नाही असेही नाही. पण विषाणू वेगाने पसरवतोय. त्यामुळे साधने असूनही या विषाणूला रोखण्यात या मातब्बर देशांना नियंत्रण मिळवता आलेले नाही.

यातून एक निष्कर्ष निघतोय की, या जागतिक महामारी – कोरोनाशी प्रभावी उपाय एकच आहे – सोशल डिस्टन्सिंग. म्हणजे, एकमेकांपासून दूर राहणे. घरातच राहणे ( CoronavirusLockdown ). कोरानापासून वाचविण्यासाठी या शिवाय दुसरा मार्ग नाही. कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तोडावी लागेल.

सोशल डिस्टन्शिंग केवळ रूग्णांनाच लागू आहे असा अनेकांचा गैरसमज आहे. ‘सोशल डिस्टन्शिंग’ सगळ्यांसाठी आहे. प्रत्येक कुटुंबियांसाठी, अगदी पंतप्रधानांसाठी सुद्धा लागू आहे. काहीजणांच्या चुकीमुळे तुम्हाला, लहान मुलांना, आई – वडिलांना, मित्रांना व पुढे जाऊन पूर्ण देशाला मोठ्या संकटात नेले जाईल.

अशी बेपर्वाईने राहिली तर भारताला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. ही किंमत किती मोठी असेल याचा अंदाज लावता येणार नाही. गेल्या दोन दिवसांत अनेक भागांमध्ये लॉकडाऊन ( CoronavirusLockdown ) झाले आहे. राज्य सरकारच्या या प्रयत्नांना लोकांनी गांभिर्याने घ्यायला हवे, अशी सुचनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

ताजा बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

CurfewInIndia : आरोग्यमंत्र्यांनी जनतेला लिहिले विनंतीपत्र

Lockdown : मुख्य सचिवांकडून अधिसूचना, 31 मार्चपर्यंत संचारबंदी

WHO : ‘कोरोना’वरील संशोधनासाठी जागतिक आरोग्य संघटनेची धडपड

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी