28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeआरोग्यचेहऱ्याची त्वचा चमकदार हवी तर रोज करा ‘हे’ व्यायाम 

चेहऱ्याची त्वचा चमकदार हवी तर रोज करा ‘हे’ व्यायाम 

जर तुम्हाला सुरकुत्या आणि बारीक रेषांची समस्या असेल तर तुम्ही चेहऱ्याच्या व्यायामाने या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. इतकेच नाही तर काळी वर्तुळे आणि निस्तेज त्वचेची समस्या असेल तर त्यातही चेहऱ्याचा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो. (facial exercises to get glowing skin)

आजकाल सर्वजण आपल्या लुकला घेऊन खूप काळजी घेतात. त्यामुळे लोक आता शरीरासोबत  चेहऱ्याचा देखील व्यायाम करत असतात. सोशल मीडियावर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील, ज्यामध्ये चेहऱ्याच्या व्यायामाचे फायदे सांगितले आहेत. चेहऱ्याचा व्यायाम त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. (facial exercises to get glowing skin)

जर तुम्हाला सुरकुत्या आणि बारीक रेषांची समस्या असेल तर तुम्ही चेहऱ्याच्या व्यायामाने या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. इतकेच नाही तर काळी वर्तुळे आणि निस्तेज त्वचेची समस्या असेल तर त्यातही चेहऱ्याचा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो. (facial exercises to get glowing skin)

स्वयंपाकघरात करा ‘हे’ व्यायाम, अनेक समस्यांपासून मिळेल आराम

दररोज सकाळी 2 मिनिटे चेहऱ्याचा हा व्यायाम केल्याने तुम्हाला अनेक फायदे होतील. चेहऱ्याचे व्यायाम करताना कोणतेही तेल किंवा मॉइश्चरायझर लावू नये हे लक्षात ठेवा, जर तुमच्यावर चेहऱ्याची कोणतीही शस्त्रक्रिया झाली असेल तर तुम्ही हे चेहऱ्याचे व्यायाम तज्ञांच्या सल्ल्यानेच करा.(facial exercises to get glowing skin)

तुम्हाला सुरुवातीला 30 सेकंद फेशियल स्लॅपिंगचा व्यायाम करावा लागेल. याचा सराव केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कायम राहते. यासोबतच रक्तप्रवाह वाढेल आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतील. यामुळे काळी वर्तुळे आणि पिगमेंटेशन कमी होईल. या व्यायामामुळे त्वचेतील कोलेजन वाढण्यासही मदत होईल. चेहऱ्यावर जास्त दाब देऊन हा व्यायाम करू नये हे लक्षात ठेवा.(facial exercises to get glowing skin)

एअर पफ पोजमध्ये ओठांवर बोट ठेवून तोंड फुगवावे लागते. हा व्यायाम किमान 30 सेकंदांसाठी करा. यामुळे त्वचा टोन्ड होते आणि घट्टही राहते. जर तुमच्या चेहऱ्यावर सूज आली असेल तर याच्या सरावाने चेहऱ्याची सूजही कमी होऊ लागते. काळी वर्तुळे कमी करण्यासाठी हा एक प्रभावी व्यायाम आहे.(facial exercises to get glowing skin)

सकाळी उपाशीपोटी प्या ‘तुळशीचे पाणी’, मिळतील अनेक फायदे

डोळे मिचकावण्याच्या व्यायामासाठी, दोन्ही डोळ्यांखाली व्ही आकार तयार करा. आता हळू हळू डोळे मिचकावून हे 15 वेळा करा. या व्यायामामुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो आणि काळ्या वर्तुळांची समस्याही कमी होऊ लागते. यामुळे डोळे निरोगी राहतात आणि त्वचा तजेलदार राहते. (facial exercises to get glowing skin)

डोळ्यांखाली टॅपिंग हा एक प्रभावी आणि सोपा व्यायाम आहे. तुम्हाला हे किमान 30 सेकंदांसाठी देखील करावे लागेल. हा व्यायाम केल्याने काळी वर्तुळे कमी होतात. याशिवाय डोळ्यांच्या सूजेपासूनही आराम मिळतो. हा व्यायाम नियमित करा. (facial exercises to get glowing skin)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी