33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यमाजी IAS प्रभाकर देशमुख 2 कोविड सेंटर्स उभारणार

माजी IAS प्रभाकर देशमुख 2 कोविड सेंटर्स उभारणार

टीम लय भारी

मुंबई : माजी IAS प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी अनुराधा देशमुख यांनी ‘ड्रीम सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून दोन ठिकाणी कोविड सेंटर्स उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे ( IAS Prabhakar Deshmukh will start two Covid Centers at Man Khatav ).

माण व खटाव अशा दोन्ही तालुक्यांत दोन सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.

पुण्यातील ‘मुकुल माधव फाऊंडेशन’च्या प्रमुख रितू छाब्रिया व ‘ड्रीम सोशल फाऊंडेशन’ यांच्या मदतीने व सहकार्याने ही दोन्ही कोविड सेंटर्स उभी केली जाणार आहेत. प्रत्येकी 50 बेड्स असे एकूण 100 बेड्स या दोन्ही सेंटर्सवर उपलब्ध केले जाणार आहेत. त्यात साधारण 60 बेडस् ऑक्सीजनच्या सुविधेनिशी सुसज्ज असतील. याशिवाय फाऊंडेशनच्या वतीने अत्यावश्यक असलेली औषधेही गरजू रुग्णांना  उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

माण-खटावमध्ये कोरोनाचा कहर, माजी IAS प्रभाकर देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र

Mandesh Foundation : आशा वर्कर्सना माणदेश फाऊंडेशकडून मदत, आजी माजी सनदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

प्रभाकर देशमुखांची जिद्द, जनतेच्या स्वप्नातील माण – खटाव घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दिला संदेश

गोंदवलेकर महाराज मंदिरातील कोविड सेंटर रद्द झाल्याने स्थानिक नेत्यांनी शोधले वेगळे पर्याय

Allow Remdesivir imports, airlift oxygen: Maharashtra CM Uddhav Thackeray urges PM Modi in virtual meeting

लक्षणे दिसताच लगेच चाचणी करा – देशमुख

कोरोनाच्या दुसरे लाटेने माण व खटाव मध्ये भीषण स्वरूप धारण केलेले आहे. अनेक लोकांना उपचार करूनही आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये तरुणांनाही मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे. काही जवळच्या सहकाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गामुळे प्रयत्न करूनही प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने आम्हाला खूप वेदना झाल्याचे प्रभाकर देशमुख आणि अनुराधा देशमुख यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे ( IAS Prabhakar Deshmukh appeal to Man Khatav people ).

लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु आपण सर्वांनी त्या भीतीवर एकजुटीने मात करण्याची आवश्यकता आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, त्यांनी न घाबरता लक्षणे दिसून येताच तात्काळ तपासणी करून घ्यावी व उपचार सुरु करावेत. लवकर व योग्य उपचार सुरु केल्यास कोरोनावर निश्चितपणे मात करता येते, असे देशमुख म्हणाले ( IAS Prabhakar Deshmukh ) .

गावागावांत प्रमुख व्यक्तींनी कोरोना संसर्ग तपासणीची मोहीम तीव्र करावी. ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे, त्या गावांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करून औषधोपचार सुरु करून देण्याबाबत ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी, असे आवाहन देशमुख ( IAS Prabhakar Deshmukh ) यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी