31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्य‘घाबरू नका, मोदीच पुन्हा येणार’; अनुपम खेर यांच्या विधानावर लोकांचा संताप

‘घाबरू नका, मोदीच पुन्हा येणार’; अनुपम खेर यांच्या विधानावर लोकांचा संताप

टीम लय भारी

शिरूर : कट्टर ‘मोदी भक्त’ असलेले अभिनेते अनुपम खेर यांनी केलेल्या एका विधानावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. ‘कोरोना’चा कहर सुरू असतानाही खेर यांना मोदी भक्ती दिसत असल्याचा राग नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे ( Anupam Kher tweeted devotion for Narendra Modi ).

ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढणारे एक ट्विट केले आहे ( Shekhar Gupta tweeted against Narendra Modi government ). ‘साठच्या दशकात मी लहान होतो. त्यामुळे देशावरील प्रत्येक संकट पाहिले. तीन मोठ्या लढाया, अन्नाचा तुटवडा, नैसर्गिक आपत्ती यांचा या संकटामध्ये समावेश होता. फाळणीनंतरची आपत्तीही पाहिली. पण सरकारी यंत्रणा हरविल्याचे भारताने आतासारखे कधीही पाहीले नाही. सध्या नियंत्रण कक्षाचा अभाव, उत्तरदायित्व स्विकारण्यास कुणीही नाही, संपूर्ण सरकारी व्यवस्थेची दाणादाण उडाल्याचे चित्र आहे; अशा झणझणीत शब्दांत गुप्ता यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे ( Shekhar Gupta fired on Narendra Modi Government ).

‘कोरोना’ संकटामुळे ( Corona Pandemic 2021 ) सध्या देशभरात मोदी सरकारबद्दल हीच भावना आहे. शेखर गुप्ता यांनी लोकांच्या मनातील ही भावनाच बोलून दाखविली. पण शेखर गुप्ता यांनी नाव न घेता मोदी सरकारचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला. शिवाय त्याची तुलना थेट काँग्रेस सरकारच्या ( प्रभावी कामगिरीशी ) केली. त्यामुळे गुप्ता यांचे हे ट्विट कट्टर मोदी भक्त असलेले अभिनेते अनुपम खेर यांना चांगलेच झोंबले ( Anupam Kher reacted on Shekhar Gupta’s tweet ).

हे सुद्धा वाचा

माजी IAS प्रभाकर देशमुख 2 कोविड सेंटर्स उभारणार

पाकिस्तानला फुकट लस देता, मग राज्याला विकत का?, काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल

जयंत पाटील यांनी सीबीआय धाडीचा नोंदविला निषेध

संतापजनक : 700 बेडचे ‘कोरोना’ रूग्णालय दोन दिवसांत उभे राहणार होते, पण निलम गोऱ्हेंच्या आडमुठेपणामुळे ते रद्द झाले

Coronavirus News Updates: US NSA Jake Sullivan speaks to NSA Ajit Doval regarding raw material supply

‘शेखर गुप्ताजी, तुमच्या दर्जापेक्षा हे जरा अतीच झालं. संपूर्ण जगासाठी ‘कोरोना’ एक संकट आहे. यापूर्वी अशा संकटाचा सामना आपण कधी केला नाही. सरकारची समिक्षा जरूर केली पाहीजे. टीकाही केली पाहीजे. पण या समस्येशी झुंज देणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तसेही तुम्ही घाबरू नका, येणार तर मोदीच.’ अशा शब्दांत अनुपम खेर यांनी आपली मोदी भक्ती व्यक्त केली ( Anupam Kher said, Narendra Modi will come again ).

खेर यांच्या या संतापजनक ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच धुलाई केली आहे. ‘घटिया इन्सान’ असे विशेषण अनेकांनी खेर ( People angry on Anupam Kher ) यांना लावले आहे.

‘माझ्या लहान मुलीने साठवलेले 5100 रुपये #PMcaresFund ला दिले होते. मोदीजी, आता माझ्या मुलीला ऑक्सीजन द्या. तिचा जीव वाचेल. ‘येणार तर कोण.. ?’ हे माहीत नाही. पण लाखो लोकांचे जीव जात आहेत. माझा परिवार ऑक्सीजनसाठी भीक मांगतोय. असे दोन ट्विट अमित मिश्रा यांनी खेर यांच्या प्रत्युत्तरदाखल केली आहेत. या ट्विटनंतर काही वेळातच राकेश मलिक यांनी उपरोक्त मुलीचा मृत्यू झाल्याचे नमूद करणारे ट्विट केले आहे.

अजित सिंग यांनी खेर यांना चांगलेच झोडले आहे. रूग्णालयाच्या अतिदक्षता, कॅज्युएल्टी कक्षात, स्मशानभूमीत ‘येणार तर मोदीच…’ असे बोला ना. रूग्णांचे कुटुंबिय व हितचिंतक तुम्हाला धन्यवाद देतील. नुसतेच घरात बसून बोलणे सोपे आहे, अशी टीका अजित सिंग यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी