31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeआरोग्यगोंदवलेकर महाराज मंदिरातील कोविड सेंटर रद्द झाल्याने स्थानिक नेत्यांनी शोधले वेगळे पर्याय

गोंदवलेकर महाराज मंदिरातील कोविड सेंटर रद्द झाल्याने स्थानिक नेत्यांनी शोधले वेगळे पर्याय

टीम लय भारी

मुंबई :   ‘कोरोना’ रूग्णांच्या बाबतीत ‘गोंदवलेकर महाराज ट्रस्ट’च्या विश्वस्तांनी ‘अस्पश्यृते’ची भूमिका घेतली आहे. पुणेरी विश्वस्तांच्या या पेशवाई निर्णयामुळे तिथे उभे राहणारे 700 खाटांचे संभाव्य रूग्णालय रद्द झाले आहे ( Covid Center will be start at Man Khatav ).

गोंदवलेकर महाराजांची शिकवण धाब्यावर बसवून या पुणेरी थाट दाखविणाऱ्या विश्वस्तांच्या कोत्या मनोवृत्तीमुळे ‘कोरोना’ रूग्णांचे प्राण कंठाशी आले आहेत. तीन दिवसांत गोंदवले परिसरात तब्बल 8 जणांचे मृत्यू झाले आहेत. या आणीबाणीच्या परिस्थितीत आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी नवीन ‘कोरोना’ सेंटर्स उभी करण्याचा निर्णय घेतला आहे ( Covid Centers will be start by Political leaders at Man Khatav ).

माजी IAS प्रभाकर देशमुख, आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे या तिघांनीही स्वतंत्र कोविड सेंटर्स सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे ( IAS Prabhakar Deshmukh, MLA Jaykumar Gore and Shekhar Gore going to start Covid Centers at Man Khatav ).

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही गोंदवले येथील आपली शाळा कोविड सेंटरसाठी देवू केली आहे.

आमदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी नगरपालिकेच्या माध्यमातून 75 बेडचे कोविड सेंटर शनिवारी सुरू केले. महिला वसतिगृहात हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. स्वतः गोरे यांनी सेंटरच्या स्थळावर दिवसभर उभे राहून सर्व साधनांनिशी सेंटर कार्यान्वित करून घेतले ( Jaykumar Gore started 75 bed Covid center at Dahiwadi ).

शेखर गोरे यांनीही गोंदवले खुर्द येथे कोविड सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. ऑक्सिजनच्या सुविधेसह येथील एका मंगल कार्यालयात गोरे यांच्यामार्फत सेंटर सुरू केले जाणार आहे ( Shekhar Gore will start Covid center at Gondavle khurd ).

माजी IAS प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी अनुराधा देशमुख यांनी ‘ड्रीम सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून दोन ठिकाणी कोविड सेंटर्स सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे ( IAS Prabhakar Deshmukh will start two Covid Centers at Man Khatav ).

माण व खटाव अशा दोन्ही तालुक्यांत दोन सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.

पुण्यातील ‘मुकुल माधव फौंडेशन’च्या प्रमुख रितू छाब्रिया यांच्या मदतीने व सहकार्याने ही दोन्ही कोविड सेंटर्स उभी केली जाणार आहेत. प्रत्येकी 50 बेड्सची असे एकूण 100 बेड्स या दोन्ही सेंटर्सवर उपलब्ध केले जाणार आहेत. त्यात साधारण 60 बेडस् ऑक्सीजनच्या सुविधेनिशी सुसज्ज असतील. याशिवाय फाऊंडेशनच्या वतीने अत्यावश्यक असलेली औषधेही गरजू रुग्णांना  उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

गोंदवलेकर महाराज ट्रस्टने ‘कोरोना’साठी रूग्णालय द्यायलाच हवे, निलम गोऱ्हे यांची भूमिका

गोंदवलेकर महाराज मंदीर ट्रस्टकडून पीएम केअर फंडाला 50 लाख, सीएम फंडाला मात्र घंटा, तरीही निलम गोऱ्हेंचा ट्रस्टवर वरदहस्त !

संतापजनक : 700 बेडचे ‘कोरोना’ रूग्णालय दोन दिवसांत उभे राहणार होते, पण निलम गोऱ्हेंच्या आडमुठेपणामुळे ते रद्द झाले

गोंदवलेकर महाराज ट्रस्टची मुजोरी, बंद पडलेले रुग्णालय सुद्धा ‘कोरोना’ सेंटरसाठी देण्यास विरोध

Allow Remdesivir imports, airlift oxygen: Maharashtra CM Uddhav Thackeray urges PM Modi in virtual meeting

लक्षणे दिसताच लगेच चाचणी करा – देशमुख

कोरोनाच्या दुसरे लाटेने माण व खटाव मध्ये भीषण स्वरूप धारण केलेले आहे. अनेक लोकांना उपचार करूनही आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये तरुणांनाही मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे. काही जवळच्या सहकाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गामुळे प्रयत्न करूनही प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने आम्हाला खूप वेदना झाल्याचे प्रभाकर देशमुख आणि अनुराधा देशमुख यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु आपण सर्वांनी त्या भीतीवर एकजुटीने मात करण्याची आवश्यकता आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, त्यांनी न घाबरता लक्षणे दिसून येताच तात्काळ तपासणी करून घ्यावी व उपचार सुरु करावेत. लवकर व योग्य उपचार सुरु केल्यास कोरोनावर निश्चितपणे मात करता येते.

गावागावांत प्रमुख व्यक्तींनी कोरोना संसर्ग तपासणीची मोहीम तीव्र करावी. ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे, त्या गावांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करून औषधोपचार सुरु करून देण्याबाबत ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी