31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यदक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या व्यक्तीला ‘ओमिक्रॉन’ करोनाचा संसर्ग?

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या व्यक्तीला ‘ओमिक्रॉन’ करोनाचा संसर्ग?

टीम लय भारी

मुंबई: आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत(Infection of ‘Omicron’ corona from South Africa)

असं असतानाच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डोंबिवलीमध्ये दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका रहिवाशाला करोनाचा लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडालीय.

Corona Vaccination in India: भारताचा नवा विक्रम! १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार

Coronavirus Vaccine : SII ला सरकारकडून मिळाली 1.10 कोटी ‘कोविशिल्ड’ची ऑर्डर, पुण्यातून पहिली बॅच झाली ‘डिस्पॅच’

‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट ज्या देशांमध्ये पसरलाय त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतच असल्याने या प्रवाशाला या नवीन प्रकारच्या घातक करोनाची लागण झालेली नाही ना याची सध्या खातरजमा करुन घेतली जात आहे.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून गेल्या बुधवारी डोंबिवलीत आलेल्या एका रहिवाशाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

corona vaccine : महाराष्ट्रासाठी उद्याचा दिवस ठरणार अत्यंत महत्त्वाचा!

8,774 new Corona cases in India

तसेच या व्यक्तीला झालेल्या करोनाचा संसर्ग हा नव्या प्रकारच्या “ओमिक्रॉन’ व्हेरिएंटचा तर नाही ना याची तपासणी करण्यासाठी जिनोम सिवेन्सिंग चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आल्याचेही पानपाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

डोंबिवलीमधील संबंधित करोना पॉझिटिव्ह व्यक्ती दक्षिण आफ्रिकेवरुन दिल्ली आणि नंतर दिल्लीवरुन मुंबईला आली होती, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आङे. त्याचप्रमाणे या व्यक्तीच्या भावाची करोना चाचणी नकारात्मक आली आहे.

तर इतर कुटुंबियांची करोना चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही. आज म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२१ रोजी या व्यक्तीच्या निकटवर्तीयांची आणि कुटुंबियांची करोना चाचणी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीबाबत फेरविचार करण्यात येत असल्याचेही केंद्राने रविवारी स्पष्ट केले. जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ विषाणूच्या संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्क केले.

‘ओमिक्रॉन’च्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी करोना चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या, प्रवाशांची इतिहासनोंद, करोना नियमावलीचे कठोर पालन, अशी चारस्तरीय उपाययोजना लागू करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्रासह विविध राज्यांनी प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी