29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeआरोग्यजपानी नागरिक पैसे देऊन घेतायत हसण्याचे धडे; जाणून घ्या काय आहे नेमकं...

जपानी नागरिक पैसे देऊन घेतायत हसण्याचे धडे; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण,…

आपल्याला कोणी एखादा विनोद सांगितला की लगेच हसू फुटते. असं म्हणतात हसायला काही पैसे लागत नाही पण तुम्हाला जाणून आश्चर्य़ वाटेल की, जपानमध्ये लोक हसण्यासाठी चक्क पैसे देऊन क्लासेस घेत आहेत. जपानमध्ये स्मायलिंग क्लासेसची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या काळात सर्वांनीच नियमाचे पालन केले मास्क तर सर्वांच्या जीवनातला अविभाज्य घटक झाला. जपानने देखील कोरोनाच्या नियमांचे पालन केले.

खरं तर कोरोनाच्या काळात जपान मधील लोकांनी मास्क घालण्याच्या नियमाचे इतके काटेकोरपणे पालन केले की, ते हसणेच विसरून गेले. कोरोनाच्या आधी देखील जपान मध्ये छोट्या मोठ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करत होते. परिणामी त्या सवयींचा असा दुष्परिणाम समोर आला. हसणे म्हणजे एका प्रकारे चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होणे. हसल्यामुळे मानसिक आणि शारिरिक आरोग्य चांगले राहते.

जपानमधील कोविडचे निर्बंध कमी केल्यानंतर अनेकजणांनी स्माईलिंग क्लासेस लावले आहेत. काही लोक आरसा समोर घेऊन हसण्याचा प्रयत्न करत आहेत. सुत्रानुसार, फेब्रुवारीमध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये निर्बंध काढल्यानंतर फक्त 8 टक्के लोकांनी मास्क घालणे बंद केले आहे. गर्दीमध्ये बिना मास्कचे कसे फिरावे असा प्रश्न अनेक लोकांसमोर निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे आहेत ‘हे’ पाच फायदे; पण ‘या’ दुष्परिणामांपासून रहा सावध

मुंबईसह कोकणाला बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका, येत्या 24 तासांत वाऱ्याचा वाढणार वेग

यावर्षी पाऊस लांबणीवर, शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागले डोळे

स्माईल कोच किको कावानो यांच्या क्लासेसचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘हॉलीवूड स्टाइल स्मायलिंग टेक्निक’ हे आहे. याद्वारे चेहरा गोल करणे, डोळे लहान करणे आणि हसणे याचे प्रशिक्षण दिले जाते. कावानो म्हणतात की, जपानी लोक इतर देशांपेक्षा कमी हसतात त्यामुळे जपानी लोकांनी इतर देशांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी डोळ्यांव्यतिरिक्त त्यांचा चेहऱ्याचाही वापर पाहिजे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी